अ‍ॅपशहर

‘ई’ पासपोर्टचा मुहूर्त दीड वर्षानंतरच!

गेली चार वर्षे केवळ चर्चेत असलेल्या ‘ई पासपोर्ट’ ही आधुनिक सेवा दीड वर्षानंतर म्हणजे जानेवारी २०१९ मध्ये सुरू होणार आहे.

Maharashtra Times 25 Jun 2017, 3:00 am
Gurubal.mali@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur e passport process painding
‘ई’ पासपोर्टचा मुहूर्त दीड वर्षानंतरच!

Tweet : @gurubalmaliMT

कोल्हापूर : गेली चार वर्षे केवळ चर्चेत असलेल्या ‘ई पासपोर्ट’ ही आधुनिक सेवा दीड वर्षानंतर म्हणजे जानेवारी २०१९ मध्ये सुरू होणार आहे. त्यादृष्टीने सर्व प्रकिया केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने पूर्ण केली आहे. या आधुनिक सेवेमुळे पोसपोर्टमधील बनावटगिरीला पूर्णपणे आळा बसणार आहे. दीड वर्षानंतर पासपोर्ट काढणाऱ्यांना ही ई पासपोर्ट सुविधा मिळणार असून मुदत संपल्यानंतर नूतणीकरण करणाऱ्यांनाही याचा लाभ होणार आहे.

भारतात सध्या साडेसात कोटी नागरिकांकडे पासपोर्ट आहेत. अन्य प्रगत देशांच्या तुलनेत भारतात पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या कमी आहे. पासपोर्ट काढण्याची क्लिष्ट प्रक्रिया आणि सुविधा केंद्रांची कमतरता यामुळे पासपोर्ट काढण्यात अडचणी येत आहेत. मात्र, गेल्या वर्षभरात पासपोर्ट काढण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे. देशातील सर्व जिल्हा पोस्टांत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी सहा महिन्यांत २५१ पासपोर्ट कार्यालये स्थापन करण्याचा निर्धार करण्यात आला असून त्या प्रक्रियेला वेग आला आहे.

पासपोर्टधारकांची संख्या वाढवण्याबरोबरची त्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ई पासपोर्ट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र गेल्या चार वर्षांत व्यापक पातळीवर ही सुविधा सुरू होऊ शकली नाही. प्रायोगिक तत्वावर राष्ट्रपती आणि काही ठराविक अधिकऱ्यांचे ई पासपोर्ट काढण्यात आले. मात्र, हे पासपोर्ट तपासण्याची यंत्रणा नसल्याने तो केवळ फार्स ठरला.

त्यामुळे गेल्या चार वर्षांच्या प्रयत्नांनी ई पासपोर्ट सुविधा जानेवारी २०१९पासून प्रत्यक्षात सुरू होईल. त्यासाठी टेंडर प्रकियादेखील पूर्ण करण्यात आली आहे. या नव्या पासपोर्टमुळे बनावटगिरीला आळा बसणार आहे. नव्या पद्धतीत पासपोर्टच्या इलेक्ट्रॉनिक चीपमध्ये संपूर्ण माहिती साठवल्याने त्यात कोणताही बदल करता येणार नाही. मशीनमध्ये पासपोर्ट स्वाइप केल्यानंतर सर्व माहिती दिसेल. यात काही बदल अथवा बनावटगिरी केल्यास ते त्याक्षणी उघडकीस येईल. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ही यंत्रणा अतिशय महत्वाची ठरणार आहे. शिवाय, इमिग्रेशन काऊंटरवरील गर्दी कमी होणार आहे.

केंद्र सरकारने ई पासपोर्ट सेवा सुरू करण्याचा निर्णय चार वर्षापूर्वी घेतला. मात्र त्याविषयीची टेक्नॉलॉजी उपलब्ध नसल्याने ही सेवा व्यापक पातळीवर सुरू करण्यात अडचणी येत होत्या. आता या अडचणी दूर झाल्या आहेत. २०१९ पासून दिले जाणारे प्रत्येक पासपोर्ट नव्या तंत्रज्ञानाने तयार केलेले असतील.

- ज्ञानेश्वर मुळे, सचिव, परराष्ट्र मंत्रालय

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज