अ‍ॅपशहर

कोल्हापुरात रामतीर्थजवळ सापडली माणसाची कवटी; डीएनए चाचणी होणार

कोल्हापूरातील रामतीर्थजवळ चक्क माणसाची कवटी सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी ही कवटी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

Edited byप्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 May 2022, 6:27 pm
कोल्हापूर : येथील आजऱ्याजवळील रामतीर्थ पर्यटनस्थळाच्या वळणावर माणसाची कवटी सापडली आहे. विजेच्या खांब्याखाली असणारी हि कवटी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अखेर पोलिसांनी या कवटीचा पंचनामा करून हि कवटी ताब्यात घेतली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम कोल्हापुरात रामतीर्थजवळ सापडली माणसाची कवटी; डीएनए चाचणी होणार
Kolhapur News


कर्णधारपद गेल्यावर रवींद्र जडेजाला अजून एक मोठा धक्का, आयपीएलमधून बाहेर पडण्याची वेळ
सुलगाव येथील तानाजी डोंगरे गावी जात असताना त्यांना विजेच्या खांब्याखाली माणसाची कवटी असल्याचे लक्षात आले. दरम्यान, रामतीर्थ पर्यटन स्थळाकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांनी ही कवटी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. कवठी कशाची असावी, येथे कोणी आणून टाकली, भोंदूगिरी करण्यासाठी आणली असावी का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

विराट कोहलीची मोठी घोषणा, आरसीबीच्या संघात बदल; धडाकेबाज खेळाडूची होणार एंट्री...
आजरा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित कवटीचा पंचनामा करून ताब्यात घेतली आहे. मिळालेल्या कवटीच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू असून या कवटीची डीएनए चाचणी केली जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी दिली.
लेखकाबद्दल
प्रशांत पाटील
प्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज