अ‍ॅपशहर

दिन, जयंत्यांमध्ये अडकले अध्यापन

शैक्षणिक वर्षात शिक्षकांना किमान ३९ दिवस ‌जयंती, ‘दिना’मध्ये साजरे करण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.

Maharashtra Times 14 Nov 2017, 3:00 am
Bhimgonda.Desai@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur problems in education systeem
दिन, जयंत्यांमध्ये अडकले अध्यापन

Tweet:@bhimgondaMT

कोल्हापूर : शैक्षणिक वर्षात शिक्षकांना किमान ३९ दिवस ‌जयंती, ‘दिना’मध्ये साजरे करण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. ११ ते ५ या अध्यापनाच्या वेळातच ‘दिन’ साजरे केले जातात. परिणामी शिक्षणाचे धडे देण्याला वेळ कमी मिळतो. त्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसतो. शैक्षणिक नुकसान होते. काही दिवस शहर, गावात जवळच्या लोकप्रतिनिधींना बोलवणे मुख्याध्यापकांना बंधनकारक केले आहे. लोकप्रतिनिधींनी उपस्थिती कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षकांना अनावश्यक उपदेश, सल्ले ऐकून घ्यावे लागते. काही लोकप्रतिनिधी प्रचार सभेप्रमाणे भाषणे करून शिक्षक, विद्यार्थ्यांना वेठीस धरतात.

शाळांच्या वेळातच शिक्षकांना अध्यापनबाह्य कामे लावली जात आहेत. प्रत्येक वर्षी शाळाबाह्य कामात भर पडत आहे. यामुळे शिक्षक ‌मिळालेल्या वेळात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गडबड करतात. अनेक विद्यार्थ्यांना अध्यापन केलेला अभ्यासक्रमाचे पूर्ण आकलन होत नाही. ते संभ्रमात राहतात. परीक्षेत त्या अभ्यासक्रमावर प्रश्न पडल्यानंतर येत नाही. गुण कमी पडतात. असे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होतात. तरीही सरकारने मतांसाठी, कोणत्या तरी घटकास खूश करण्यासाठी प्रत्येक वर्षी दिन साजरे करण्याचा सपाटाच लावला आहे.

एका वर्षात नव्याने पाच दिवस साजरे करण्याच फतवा सरकारने काढला आहे. हे पाच आणि पूर्वीचे ३४ दिन, जयंत्या, उपक्रम साजरे करण्यात मुख्याध्यापक, शिक्षक मेटाकुटीस आले आहे. सरकारकडून आदेश आल्यामुळे जिल्हा, तालुका प्रशासन शहर, ग्रामीणमधील प्राथमिक, माध्यमिक शाळांना अंमलबजावणीची सक्ती करते. प्रत्येक‌ दिन, उपक्रमाचा विद्यार्थ्यांना कितपत फायदा होतो त्याचे स्वतंत्रपणे मूल्यमापन आजअखरे शिक्षण प्रशासनाने केलेले नाही. त्यामुळे शिक्षण यंत्रणाही दिन साजरे करून नेमके काय साध्य केले हे सांगू शकत नाही. शालेय वयात काहीही संबंध नसणारे दिन साजरे कशासाठी करायचे असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


महत्वाचे दिन असे

वाचन प्रेरणा, फुटबॉल मिशन, वृक्ष लागवड, योग, विद्यार्थी, बाल, साक्षरता, शिक्षक, संविधान, जल‌असे महत्वाचे दिन आहेत. याशिवाय जयंती, उपक्रम साजरे केले जातात.



विद्यार्थ्यांच्या हितासाठी नसलेले दिन, उपक्रम टाळणे गरजेचेच आहे. अभ्यासक्रमाशी संबंधीत दिन, कार्यक्रम साजरे झाल्यास शिक्षक, विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. अध्यापनासाठी वेळ कमी पडतो. यामुळे शालेय वयात जे गरजेचे नाहीत, असे उपक्रम, दिन होऊ नयेत.

सदानंद माने, पालक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज