अ‍ॅपशहर

​ अॅड. निकम यांची नियुक्ती करा

म. टा. वृत्तसेवा, सांगली‘अमानुष मारहाण करून अनिकेत कोथळेचा बळी घेणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची जनमानसातून तीव्र शब्दात निंदा होऊ लागली आहे. गुरुवारी सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीने व्यापक बैठक घेऊन राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळावा तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशा मागण्या केल्या आहेत. ही समिती विविध पातळ्यांवर या मागण्यांचा पाठपुरावा करणार असून, यासंबंधीचे निवेदन मानवी हक्क आयोगासह सर्व सरकारी यंत्रणांना देण्यात येणार आहे,’ अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक सतीश टाकळकर यांनी दिली.

Maharashtra Times 10 Nov 2017, 3:00 am
‘अमानुष मारहाण करून अनिकेत कोथळेचा बळी घेणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची जनमानसातून तीव्र शब्दात निंदा होऊ लागली आहे. गुरुवारी सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीने व्यापक बैठक घेऊन राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळावा तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशा मागण्या केल्या आहेत. ही समिती विविध पातळ्यांवर या मागण्यांचा पाठपुरावा करणार असून, यासंबंधीचे निवेदन मानवी हक्क आयोगासह सर्व सरकारी यंत्रणांना देण्यात येणार आहे,’ अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक सतीश टाकळकर यांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur sangali jadhav murder case
​ अॅड. निकम यांची नियुक्ती करा

सांगलीतील शासकीय विश्रामगृहात झालेल्या व्यापक बैठकीत सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत घडलेल्या गंभीर प्रकाराचा निषेध करण्यात आला. या बैठकीत सर्वपक्षीय प्रतिनिधींनी आपली मते मांडली. त्यानंतर सर्वानुमते सरकारले देण्यासाठी मागण्या निश्चित करण्यात आल्या. याबाबत टाकळकर म्हणाले,‘ राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळावा, सांगली जिल्हा पोलिस दलाची फेररचना करावी, पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, अनिकेत कोथळे खून प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या प्रकरणाच्या दरम्यान जे कोणी कर्तव्यावर होते त्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी. विशेषतः पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची स्वतंत्रपणे चौकशी करावी. मृत अनिकेतच्या पत्नीला सरकारी नोकरी द्यावी. कोथळे कुटुंबाला २५ लाख रुपयांची अर्थिक मदत द्यावी अशा प्रमुख मागण्या आम्ही निश्चित केल्या आहेत.’ ‘त्याचबरोबर पोलिसांवर असलेल्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधिक्षकाची तत्काळ बदली करावी. अनिकेतच्या खुनातील संशयितांची प्राप्तीकर विभागाकडून चौकशी करुन त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेवर टाच आणावी, झीरो पोलिस ही संकल्पना हद्दपार करावी. सर्व पोलिस ठाण्यांमध्ये आणि चौक्यांमधील सीसीटीव्ही बसवून ते २४ तास कार्यरत राहतील याची खबरदारी घ्यावी, अशाही मागण्या या वेळी निश्चित करण्यात आल्याचे टाकळकर यांनी सांगितले. शिवसेनेचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांनीही गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाती पोलिसांचा निषेध केला.
सांगलीत घडलेल्या अनिकेत कोथळेच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेला कडक शिक्षा करावी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री असल्याने त्यांनाही या प्रकरणी सहआरोपी करावे, अशी मागणी मिरज विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. प्रमोद इनामदार यांनी एका निवेदनाद्वारे प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोथळे कुटुंबियांना न्याय देण्यासाठी पुढे आलेल्या कोणालाही पोलिसांकडून धमकावण्याचा प्रयत्न झाल्यास संबधितांनी कृती समितीशी संपर्क साधावा. या प्रकरणात सर्वपक्षीय नेते माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतील. या प्रकरणामध्ये अनिकेतच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार आहेत. त्यामुळे माहिती कृती समितीला द्यावी, असे टाकळकर यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज