अ‍ॅपशहर

ऊसदराची मजल तीन हजारांवर ?

ऊस हंगाम सुरू करण्याचा प्रश्न मार्गी लागला असला तरी यंदाच्या हंगामातील दराची अजून चर्चाच सुरू झालेली नाही.

Maharashtra Times 22 Oct 2016, 4:00 am
Udaysing.patil@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur sugercane frp issue
ऊसदराची मजल तीन हजारांवर ?


udaysingpatilMT

कोल्हापूर : ऊस हंगाम सुरू करण्याचा प्रश्न मार्गी लागला असला तरी यंदाच्या हंगामातील दराची अजून चर्चाच सुरू झालेली नाही. त्यामुळे एक नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसदराच्या संभाव्य आंदोलनांमुळे हंगाम सुरू होण्यास नोव्हेंबरची पंधरा तारीख उजाडण्याची शक्यता आहे.

स्वाभीमानी संघटनेची ऊस परिषद मंगळवारी (ता. २५ ऑक्टोबर) होत आहे. त्याचवेळी दराबाबत चर्चेला सुरूवात होईल. यंदा तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दराचे गणित शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी मांडले आहे. त्यापेक्षा किती जास्त दर मिळेल याची उत्सुकता लागली आहे. उसाची कमी उललब्धता, सीमाभागातील ऊस कर्नाटकात नेला जाण्याची शक्यता यामुळे सरकार आणि कारखानदारांनी पुढाकार घेऊन चर्चा पूर्ण केल्यास सर्वांनाच बसणारा फटका कमी करता येणार आहे. अन्यथा, आंदोलनाची धग पेटत राहून शेतकऱ्यांसह कारखानदारांनाही फटका बसू शकतो.

गेल्या दोन हंगामात बाजारात असलेल्या साखरेच्या कमी दरामुळे संघटनेला ऊस दराबाबत आग्रही भूमिका घेता आली नव्हती. किमान एफआरपी घेण्याबरोबरच ती दोन टप्प्यात घेण्याचीही भूमिका स्वीकारावी लागली होती. यंदा साखरेचा दर चांगलाच वधारला आहे. दर त्यापेक्षा जास्त जाऊ नये यासाठी केंद्र सरकारने लक्ष घातले आहे. त्यामुळे सध्या राज्य बँकेने साखरेचे प्रति क्विंटल मूल्यांकन ३२०० रुपये केले आहे. या मूल्यांकनामुळे त्यातील ८५ टक्के रक्कम ऊस दरासाठी देणे क्रमप्राप्त आहे. हा दर १९७० रुपयांपर्यंत गेला आहे.

गळीत हंगाम पुढील महिन्यात सुरू होणार असल्याने राज्य बँक पुनर्मूल्यांकन करणार आहे. हे मूल्यांकन थोडे जरी वाढले, तरी बँकेकडून दिल्या जाणाऱ्या उचलीपैकी केन पेमेंटसाठीची रक्कम २ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. संघटनेने पूर्वीपासूनच एफआरपीपेक्षा जास्त उचल घेण्याचा पवित्रा घेतला आहे. तर प्रति टनासाठी सरकारने ५०० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी कारखानदारांनी केली आहे. गेल्यावर्षी उताऱ्याप्रमाणे जिल्ह्यातील काही कारखान्यांनी २८०० रुपयांपर्यंत ऊस ​दर दिला. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील उतारा १२.६९ टक्के होता. तर सांगलीत उतारा १२.१० टक्के होता. यंदा साखरेचा उतारा कमी होईल अशी चर्चा सुरू आहे. मात्र सध्याची स्थिती पाहिली तर एफआरपीपेक्षा जास्त दर मिळू शकतो. शेतकऱ्यांना एफआरपी आरामात एकरकमी मिळू शकते अशी जाणकारांची अटकळ आहे. फक्त त्यापेक्षा किती जास्त दर द्यायचा याचा सारासारा विचार करण्यासाठी कारखानदारांनी आतापासूनच तयारी केली पाहिजे.

यंदा पहिली उचल एफआरपीपेक्षा जास्त असेल असे आमचे धोरण आहे. त्याशिवाय संघटना तोडगा मान्य करणार नाही. साखरेचे दर पाहता त्यादृष्टीने सरकारने पुढाकार घेऊन बैठक बोलवावी. सारासार विचार करुन यंदा दरनिश्चितीची गरज आहे. आम्ही केव्हाही चर्चेस तयार आहोत.

राजू शेट्टी, खासदार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज