अ‍ॅपशहर

३४ प्लससाठी गोळाबेरीज

कोल्हापूर ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्ता स्थापना करण्यासाठी निकालाच्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू आहे. ३४ प्लसचा आकडा गाठून सत्तेच्या चाव्या मिळविण्यासाठी कुणालाही सोबत घेण्याची तयारी मोठ्या राजकीय पक्षांनी सुरू केली आहे.

Maharashtra Times 23 Feb 2017, 3:00 am
Sachin.Yadav@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kolhapur zp result part situation
३४ प्लससाठी गोळाबेरीज


tweet : @sachinyadavMT

कोल्हापूर ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्ता स्थापना करण्यासाठी निकालाच्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू आहे. ३४ प्लसचा आकडा गाठून सत्तेच्या चाव्या मिळविण्यासाठी कुणालाही सोबत घेण्याची तयारी मोठ्या राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. सर्वांत मोठा पक्ष आमचाच होईल, असे भाष्य करणाऱ्या राजकीय पक्षांना घटक पक्षांची मदत घ्यावीच लागेल, असे चित्र आहे. काँग्रेसला बहुमतासाठी चार ते पाच जागा कमी पडत असल्यास शिवसेना किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. भाजप जादा जागा जिंकल्यास शिवसेनेसह अन्य आघाडीची युती करून सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत त्रिशंकू संख्या झाल्यास घटक पक्षांचा वजन वाढण्याची शक्यता आहे. मातोश्रीवरून आदेश आल्यानंतर शिवसेना सत्तेची गणिते निश्चित करणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद नव्या राजकीय समीकरणाचे संकेतही मांडली जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या जादूई आकडण्याची चर्चा रंगली आहे.

जिल्हा परिषदेच्या ६७ आणि पंचायत समितीच्या १३४ गणांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी ९०५ उमेदवार रिंगणात आहेत. २०१२ मध्ये जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात होती. काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्षाला सोबत घेऊन सत्ता मिळविली. २०१७ च्या निवडणुकीत भाजपप्रणित आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करीत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ३४ प्लस जागा मिळाल्यास दोन्ही काँग्रेसची सत्ता स्थापन करू शकतात. या दोन्ही काँग्रेस ३२ जागा जिंकल्यास आवाडे गटाची युती करून सत्तेची गोळाबेरीज करू शकतात. ३४ च्यापुढे जागा मिळाल्यास दोन्ही काँग्रेसला घटक पक्षाच्या मदतीची गरज भासणार नाही. काँग्रेससोबत राष्ट्रवादीला बरोबरीने सत्तेची संधी मिळू शकते. कोल्हापूर महापालिकेप्रमाणे काँग्रेसला राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यास एकहाती सत्ता येणे शक्य आहे. त्यासाठी जिंकून येणाऱ्या जागेची गणिते नेत्यांकडून मांडली जात आहेत. गेल्यावेळी सभागृहात काँग्रेसला ३२ जागा मिळाल्या होत्या. या निकालात २० जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादीला गेल्यावेळच्या सभागृहात १६ जागा मिळाल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीला १३ जागा मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला गतवेळी एकमेव जागा मिळाली होती. यावेळी भाजपला चिन्हावर ८ जागा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपप्रणित आघाडीत ताराराणी पक्ष, युवक क्रांती आघाडीसह स्थानिक आघाडी मिळून सत्ता स्थापनेची गणित मांडली जात आहेत. स्वाभिमान पक्षातही फूट पडल्याने स्वाभिमानीच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. गेल्यावेळच्या सभागृहात स्वाभिमानीच्या पाच जागा होत्या. शिवसेनेला गतवेळेच्या सभागृहात ६ जागा होत्या. यावेळी दहा ते बारा जागांपर्यंत शिवसेना मजल मारू शकेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. जनसुराज्य शक्ती आणि स्थानिक आघाडीची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. स्थानिक आघाडीला सहा ते आठ ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसला १९, राष्ट्रवादीला ११ आणि आवाडे गटाच्या २ जागा घेऊन काँग्रेस ३२ जागांपर्यंत पोहोचू शकते. शिवसेना १४, भाजप ८ आणि जनसुराज्य ८ जागा घेऊन २८ पर्यंत बलाबल होईल, अशी शक्यता आहे. ३४ प्लसचा आकडा गाठण्यासाठी अन्य आघाडीसह स्वाभिमानी, ताराराणी आघाडी, हत्तरकी गट, अप्पी पाटील, आबीटकर, युवक क्रांती आघाडीचे उमेदवार निवडून आल्यास सत्ता स्थापनेचा दावा मांडला जात आहे. भाजप, जनसुराज्य, ताराराणीला शिवसेनेने मदत केल्यास सत्तेचा दावा करू शकतात. त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक सत्तेसाठी मोट बांधण्याची शक्यता आहे. भाजप १५, जनसुराज्य ८, ताराराणी आघाडी ४, आमदार कुपेकर गट १, धैर्यशील माने गट १ असे एकूण २९ जागांची गणिते मांडली जात आहेत. यामध्ये स्वाभिमानी, शिवसेनेची भूमिकाही निर्णायक ठरू शकते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज