इचलकरंजी : कर्जापोटी घेतलेल्या रकमेची व्याजासह परतफेड करूनही पैशाची मागणी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नितीन दिलीप लायकर याच्याविरोधात सावकारी केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सूरज संतोष सदलगे (वय १९, रा. पि. बा. पाटील मळा) याने फिर्याद दिली आहे. सूरज सदलगे वाहनचालक असून, त्याच्या आईने घरगुती अडचणीसाठी लायकरकडून सात हजार रुपये १५ टक्के व्याजाने काढले होते. त्यापोटी १२ हजार रुपये दिले आहेत. तरीही लायकर सूरजकडे आणखी पैशाची मागणी करत होता. त्यातूनच सूरजला लायकरने मारहाण करत जीवे मारण्याची धमकही दिली होती. याप्रकरणी लायकरयाला अटक करण्यात येणार आहे.
लायकरवर सावकारीचा गुन्हा
कर्जापोटी घेतलेल्या रकमेची व्याजासह परतफेड करूनही पैशाची मागणी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नितीन दिलीप लायकर ...
Maharashtra Times 22 Sep 2018, 4:00 am