अ‍ॅपशहर

वादग्रस्त दारु दुकान अखेर सील

येथील शिवाजीनगर बावणे गल्ली परिसरात भरवस्तीत असलेले देशी दारू दुकान एक महिन्यासाठी बंद करावे, असा आदेश जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दिल्यानंतर शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हे दुकान सील केले

Maharashtra Times 26 Jun 2016, 1:49 am
इचलकरंजी -
महाराष्ट्र टाइम्स.कॉम liquor shop sealed
वादग्रस्त दारु दुकान अखेर सील


येथील शिवाजीनगर बावणे गल्ली परिसरात भरवस्तीत असलेले देशी दारू दुकान एक महिन्यासाठी बंद करावे, असा आदेश जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दिल्यानंतर शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हे दुकान सील केले. एक महिन्यानंतर दुकानासंदर्भात मतदान घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुकान कायमस्वरुपी बंद होण्यासाठी आंदोलनकर्त्यांना एक महिना प्रतिक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर परिसरातील आंदोलक महिलांनी आनंद साजरा केला. बावणे गल्ली येथील रेवती जाधव यांच्या मालकीचे देशी दारु दुकान स्थलांतरीत करावे या मागणीसाठी मागील ५३ दिवसांपासून दुकानासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाला विविध संघटना, पक्ष, राजकीय नेत्यांसह विविधस्तरांतून पाठिंबा मिळत होता. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीही या आंदोलनात उडी घेत महिलांना पाठबळ दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या आंदोलनकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोपही देसाई यांनी केला होता.

बावणे गल्लीतील दारु दुकानाचा परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास नसल्याचे निवेदन याच भागातील काही महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर ५३ दिवस सुरु असलेल्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यामध्ये त्यांनी दारू दुकान बंद करण्यासाठी महिलांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे दुकान एक महिना बंद करण्याचा आदेश जारी केला. त्यानुसार शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरिक्षक एल. एम. शिंदे यांनी हे दारू दुकान सील केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज