अ‍ॅपशहर

बुधवारी मुख्यमंत्र्यासोबत बैठक

महापालिकेने प्लास्टिकबंदीवरुन कारवाई सुरू केल्यानंतर सायंकाळी किराणा दुकानदार, कापड व्यापारी, फरसाणा विक्रेते, चिरमुरे विक्रेत्यांची सर्किट हाऊस ...

Maharashtra Times 24 Jun 2018, 4:00 am

महापालिकेने प्लास्टिकबंदीवरुन कारवाई सुरू केल्यानंतर सायंकाळी किराणा दुकानदार, कापड व्यापारी, फरसाणा विक्रेते, चिरमुरे विक्रेत्यांची सर्किट हाऊस येथे बैठक झाली. रिसायकल होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला परवानगी मिळावी. महापालिकेने रिसायलकल प्लँटसाठी जागा द्यावी, अशा मागण्या मांडल्या. तसेच त्यांनी महापालिकेच्या कारवाईसंदर्भात आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे तक्रारी केल्या. दरम्यान आमदार क्षीरसागरांनी प्लास्टिक बंदीसंदर्भात बुधवारी मुख्यमंत्र्यासोबत बैठक होणार आहे. त्यामध्ये तुमच्या व्यथा मांडू अशी ग्वाही दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज