चंदगड : हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील बसस्थानकाच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ह्या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. परिसराची स्वच्छता करून प्रवाशांना ऊन, पाऊस यापासून सुरक्षा मिळावी. आठ दिवसांच्या आत समस्या दूर कराव्यात, अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष राज सुभेदार यांनी निवेदनाद्वारे हलकर्णी ग्रामपंचायतीला दिला आहे.
आंदोलनाचा इशारा
हलकर्णी फाटा (ता चंदगड) येथील बसस्थानकाच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे ह्या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे...
Maharashtra Times 19 Jul 2018, 4:00 am