अ‍ॅपशहर

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणीपतीसह तिघांना पोलिस कोठडी

शहापुरातील करांडे मळा परिसरातील विवाहिता तरन्नुम फारुख मारुक (वय २६) हिच्या मृत्यू प्रकरणी शहापूर पोलिसांनी अटक केलेल्या पती फारुख कलीउद्दीन मारुक, सासरे कलीउद्दीन चाँदसाहेब मारुक, दीर असिफ कलीउद्दीन मारुक या तिघांना न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

Maharashtra Times 22 Nov 2017, 3:00 am
इचलकरंजी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police custudy
विवाहितेच्या मृत्यूप्रकरणीपतीसह तिघांना पोलिस कोठडी


शहापुरातील करांडे मळा परिसरातील विवाहिता तरन्नुम फारुख मारुक (वय २६) हिच्या मृत्यू प्रकरणी शहापूर पोलिसांनी अटक केलेल्या पती फारुख कलीउद्दीन मारुक, सासरे कलीउद्दीन चाँदसाहेब मारुक, दीर असिफ कलीउद्दीन मारुक या तिघांना न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

तरन्नुम हिने आत्महत्या केल्याची घटना कळताच तरन्नुमच्या माहेरकडील नातलगांनी पती फारुख, सासरा कलीमुद्दीन आणि दीर आसिफ या तिघांना मारहाण करुन त्यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली होती. सासरी झालेल्या छळामुळेच तरन्नुमने आत्महत्या केल्याची फिर्याद तरन्नुमचे वडील इम्तियाजअहमद शमशुद्दीन हंगड (रा. मिरज) यांनी दिली होती. फिर्यादीनुसार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करून फारुखसह तिघांना अटक केली आहे. तर सासू आखाबो मारुक, जाऊ आजादुन मारुक आणि ओमाणी मारुक(सर्व रा. मूळ गाव कुडची सध्या रा. करांडे मळा शहापूर) यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. तर अधिक तपासासाठी तरन्नुम हिचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.

वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत, विवाहानंतर तरन्नुम हिचा पतीसह सासरा, सासू, दीर व जावांनी माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ सुरू केला होता. मागणीप्रमाणे मुलीच्या सासरच्या मंडळींना पैसे देण्यात आले. तरीही सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशाची मागणी केली जात होती. त्यासाठी तरन्नुमचा मानसिक व शारीरिक छळ सुरु होता. तरन्नुमने माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने तिचा छळ झाल्याने तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. सासरच्या मंडळींनी मुलीचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे सांगून कुडची (ता. रायबाग) येथे अंत्यसंस्कारासाठी पार्थिव नेण्यात येत असल्याचे तरन्नुमच्या नातलगांना सांगितले होते. त्यामुळे शंका आल्याने वडील हंगड यांनी नातेवाईकांसह इचलकरंजीत येऊन पाहणी केली असता आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज