अ‍ॅपशहर

जयसिंगपुरात पोलिसांचाहॉटेलवर छापा

इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जयसिंगपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने येथील नांदणी नाक्याजवळील मनाली हॉटेलवर छापा टाकला.

Maharashtra Times 7 Jul 2017, 3:00 am
,जयसिंगपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police red
जयसिंगपुरात पोलिसांचाहॉटेलवर छापा


इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जयसिंगपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने येथील नांदणी नाक्याजवळील मनाली हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत हॉटेल मालक तसेच अन्य एका कर्मचाऱ्यासह २८ जणांना ताब्यात घेण्यात आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

कोणताही परवाना नसताना मनाली हॉटेलमध्ये दारूविक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास मिळाली होती. यानंतर पोलिस उपअधिक्षक रमेश सरवदे यांमया मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जयसिंगपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरूवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत हॉटेल मालक शिवाजी वसंत सावंत यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच १२ हजार ५०० रूपये किंमतीची देशी, विदेशी दारूच्या बाटल्या तसेच दोन हजार ४०० रूपयांची रोकड पथकाने जप्त केली. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या २८ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल, यानंतरच दारूबंदी कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करून शुक्रवारी न्यायालयात उभे करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक एस.ए.निकम यांनी दिली. दरम्यान, छाप्यात २८ जणांना पथकाने ताब्यात घेतल्याने जयसिंगपूर पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज