अ‍ॅपशहर

चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत

शेती आणि शेतकऱ्यांबाबत सरकारी धोरणे अत्यंत चुकीची आहे,’ असे मत कृषिमित्र रमेश जाधव यांनी व्यक्त केले.

Maharashtra Times 22 Dec 2017, 3:06 am
म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramesh jadhav speach
चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत


‘भारत शेतीप्रधान देश आहे. शेतीवर जवळपास सर्वच क्षेत्रांतील आर्थिक समीकरणे अवलंबून आहेत. मात्र, तरीही सरकारी धोरणांमुळे शेती हा नफ्याचा नव्हे तर तोट्याचा व्यवसाय बनला आहे. शेती आणि शेतकऱ्यांबाबत सरकारी धोरणे अत्यंत चुकीची आहे. सर्वप्रथम या धोरणांमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला असून, माध्यमांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली पाहिजे,’ असे मत कृषिमित्र रमेश जाधव यांनी व्यक्त केले.

येथील नगरपालिका पूज्य साने गुरुजी सार्वजनिक मोफत वाचनालयामार्फत आयोजित लोकशिक्षण व्याख्यानमालेत ‘शेती, राजकारण आणि माध्यमे’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना जाधव बोलत होते. यावेळी प्रा. जे. बी. केसरकर प्रमुख उपस्थित होते.

जाधव म्हणाले, ‘देशाला पुरेसे अन्नधान्य पुरविण्याचा क्षमता शेतकऱ्यांमध्ये आहे म्हणजे तो नक्की कर्तृत्ववान आहे. पण तरीही त्याचे कर्ज थकते का याचा विचार झाला पाहिजे. शेती निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाची साथ मिळाली आणि उत्पादन चांगले झाले तरीही सरकार असे काही धोरण राबवते की, शेतकरी पुन्हा अडचणीत येतो. त्यामुळे सर्वप्रथम शेती व्यवसायात नफ्यात येईल अशी धोरण राबविणे आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांनी शेतकऱ्यांची बाजू समाजासमोर मांडून त्यांच्या मूळप्रश्नाला वाचा फोडली पाहिजे.’

प्रा. केसरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी, नितीन देसाई, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे, वाचनालय सभापती नरेंद्र भद्रापूर, सहायक ग्रंथपाल राजेंद्र भुईबर आदी उपस्थित होते. श्रद्धा शिंत्रे यांनी स्वागत केले. वीणा कापसे यांनी आभार मानले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज