अ‍ॅपशहर

स्थायीत अधिकारी धारेवर

जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सायकल वाटप योजना व एमएससीआयटी प्रशिक्षण योजनेच्या निधीवरून वादावादी झाली...

Maharashtra Times 19 Jul 2018, 4:00 am

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सायकल वाटप योजना व एमएससीआयटी प्रशिक्षण योजनेच्या निधीवरून वादावादी झाली. पंचायत समितीकडून प्रस्ताव मंजूर होऊनही निधी वाटपास जाणूनबुजून विलंब केला जात असल्याचा आरोप समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे यांनी केला. महिला व बालकल्याण समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांना त्यांनी या योजनेच्या निधीवरुन धारेवर धरले. बैठकीत वादावादीचे स्वरुप प्राप्त झाल्यानंतर उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी त्यामध्ये हस्पक्षेप केला. दहा मिनिटाच्या गोंधळानंतर सभेला पुन्हा सुरुवात झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक सभेच्या अध्यक्षस्थानी होती. विविध समित्यांचे सभापती व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक झाली. प्रस्तावानुसार निधी वाटपाचा निर्णय होऊन त्याप्रश्नी मार्ग काढला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज