अ‍ॅपशहर

बेळगावात कन्नड फलक लावा: सिद्धरामय्या

आगामी कर्नाटक राज्योत्सवापूर्वी बेळगाव जिल्ह्यातील सगळ्या व्यापारी आस्थापनांवर कन्नड फलक लावले गेले पाहिजेत, अशी सूचना कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रा.एस.जी.सिद्धरामय्या यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. कर्नाटक राज्योत्सव दरवर्षी १ नोव्हेंबरला साजरा केला जातो.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Sep 2018, 11:19 pm
बेळगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम siddharamaiyyah

आगामी कर्नाटक राज्योत्सवापूर्वी बेळगाव जिल्ह्यातील सगळ्या व्यापारी आस्थापनांवर कन्नड फलक लावले गेले पाहिजेत, अशी सूचना कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रा.एस.जी.सिद्धरामय्या यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. कर्नाटक राज्योत्सव दरवर्षी १ नोव्हेंबरला साजरा केला जातो.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रा.एस .जी.सिद्धरामय्या यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत कन्नड भाषेच्या प्रगती आणि प्रसारविषयी चर्चा करण्यात आली.जिल्ह्यातील सगळी दुकाने आणि व्यापारी आस्थापने यावर कन्नड फलक लावण्यासाठी तयारी करा आणि त्याचा अहवाल पाठवून द्या असा आदेशही सिद्धरामय्या यांनी बैठकीत बजावला.

कन्नड भाषा फलक सप्ताह

विशेष म्हणजे सिद्धरामय्या यांनी या बैठकीत कन्नड भाषा फलक सप्ताह आयोजन करून कन्नड फलक लावण्यासंबंधी जागृती करण्याची सूचनाही त्यांनी केली. कन्नड भाषेव्यतिरिक्त अन्य भाषेत फलक असेल तर त्यावर साठ टक्के भागात कन्नडमध्ये लिहिले गेले पाहिजेत. शहरातील मार्गाना देखील कन्नड मध्ये नावे द्या. नावे दिलेली नसतील तर कन्नड साहित्यिक,स्वातंत्र्यवीर यांची नावे त्यांना द्या, असेही सिद्धरामय्या यांनी बैठकीत सांगितले. बैठकीला जिल्हाधिकारी एस.झियाउल्ला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज