अ‍ॅपशहर

Video: सांगलीत महापुरातून वरात! नवदाम्पत्य बोटीतून पोहोचले घरात

Sangli Flood: पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळं हजारोंच्या तोंडचं पाणी पळवलं असताना सांगलीत एका बहाद्दरानं पुराच्या पाण्यावर स्वार होत थेट बोटीतून लग्नाची वरात काढली.

Edited byगणेश कदम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jul 2021, 2:05 pm

हायलाइट्स:

  • सांगलीत महापुरातून निघाली लग्नाची वरात
  • नवदाम्पत्य बोटीतून पोहोचले लगीनघरी
  • अनोख्या वरातीचा व्हिडिओ व्हायरल
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
म. टा. प्रतिनिधी । सांगली
सांगलीत नववधूने अनोखा गृहप्रवेश केला. महापुराच्या पाण्यातूनच नवदाम्पत्य बोटीने घरी पोहोचले. संकटातही हौस पुरी करणाऱ्या या नवदाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगलीतील गावभाग परिसरात हा प्रकार घडला.

सांगली शहराला गेल्या चार दिवसांपासून महापुराचा विळखा बसलाय. जवळपास निम्मे शहर पाण्याखाली गेले आहे. जिल्ह्यात सुमारे दोन लाख लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले. पुराच्या धास्तीने हजारो लोकांची तारांबळ उडाली असताना एका नवदाम्पत्याने थेट पुरातूनच आपल्या लग्नाची वरात काढून लक्ष वेधले. एकीकडे आपल्या कुटुंबाची चिंता पूरग्रस्त सांगलीकरांना लागलेली असतानाच हौसेला काही मोल नसतं असाच प्रकार पाहायला मिळाला.

वाचा: ‘गुजरातप्रमाणे केंद्राने महाराष्ट्राला १ हजार कोटी द्यावेत, भाजपवाल्यांनी तो चेक आणावा'

सांगलीतल्या गावभाग मध्ये राहणाऱ्या एका तरुणाचा नुकताच विवाह झाला. तरुणाच्या घरात पुराचे पाणी आले तरीही त्यांनी लग्नाचा मुहूर्त चुकवला नाही. सुरक्षित स्थळी पोहोचून नातेवाईकांनी शुभमंगल उरकलं. यानंतर गृहप्रवेश करण्यासाठी नवदाम्पत्यांनी थेट बोटीतून प्रवास करीत आपले घर गाठले. लग्नाची वरात चक्क बोटीतून काढली. सध्या नवरदेव आणि नवरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मारुती चौक येथे सगळी दुकाने व गाळे पाण्यात गेले असताना लग्नाची वरात संकल्प फाउंडेशनच्या बोटीतून नेली.

वाचा: मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; संजय राऊत यांच्या ट्वीटची जोरदार चर्चा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज