गडहिंग्लज : बिरेश्वर संस्थेतर्फे विद्यार्थांना शाखेचे चेअरमन रामगोंडा पाटील व मान्यवरांच्या हस्ते स्कॉलरशिप रकमेचे वितरण करण्यात आले. संस्थेच्या वतीने आर्थिक व्यवहाराबरोबर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रम राबविण्यात येतात. याचाच भाग म्हणून सभासदांच्या मुला-मुलींना जमा झालेल्या रकमेतून स्कॉलरशिप देण्यात आल्या. यावेळी संचालक विठ्ठल भमानगोळ, दीपक साखरे, संतोष पाटील, कर्मचारी स्वाती पाटील, बाहुबली पाटील, आदी उपस्थित होते.
‘बिरेश्वर’तर्फे स्कॉलरशिप
बिरेश्वर संस्थेतर्फे विद्यार्थांना शाखेचे चेअरमन रामगोंडा पाटील व मान्यवरांच्या हस्ते स्कॉलरशिप रकमेचे वितरण करण्यात आले...
Maharashtra Times 25 Jun 2018, 4:00 am