कोल्हापूर: सातव्या वेतन आयोगासंदर्भात वेतननिश्चिती करण्यासाठी प्राध्यापकांकडून होत असलेल्या आर्थिक मागणीचे व्यवहार बंद करावे, यासाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे गुरुवार (ता. २७) रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर दुपारी तीन ते सायंकाळी सहा यावेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, प्राध्यापकांच्या वेतननिश्चितीबाबत २९ जूनपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असून सुटातर्फे आंदोलन स्थगित करावे, असे शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्यावतीने सुटाला पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. मात्र जोपर्यंत ठोस कार्यवाहीचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात येणार नाही अशी भूमिका सुटातर्फे घेण्यात आली आहे.
सुटातर्फे गुरुवारी धरणे
सातव्या वेतन आयोगासंदर्भात वेतननिश्चिती करण्यासाठी प्राध्यापकांकडून होत असलेल्या आर्थिक मागणीचे व्यवहार बंद करावे, यासाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jun 2019, 4:00 am