कोल्हापूर: जिल्ह्यातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिकाविरोधात कडक पावले उचलण्यास जिल्हा आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. ज्या डॉक्टरांविषयी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची तत्काळ तपासणी करण्याचे आदेश तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना मंगळवारी देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांच्या उपस्थितीमध्ये तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करताना आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेशही याप्रसंगी दिले.
बोगस डॉक्टरांवर कारवाईचे करा
जिल्ह्यातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिकाविरोधात कडक पावले उचलण्यास जिल्हा आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Oct 2019, 4:00 am