कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्राचा ट्रक सर्वात शेवटी दुपारी अडीच वाजता रमनमळा येथे दाखल झाला. 'हातकणंगले'तील शिराळा विधानसभा मतदासंघातील यंत्राचा ट्रक राजाराम तलावाशेजारी गोडाऊनमध्ये दुपारी तीन वाजता दाखल झाला. सर्व यंत्रे सायंकाळी ७ वाजता गोडाऊन सीलबंद करण्यात आले. निकाल लागेपर्यंत म्हणजे २३ मेपर्यंत पोलिस बंदोबस्तासह कोणत्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना पाहाऱ्यासाठी यायचे असल्यास त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय रोज दोनवेळा सहायक निवडणूक अधिकारी उपस्थित राहून सुरक्षेचा आढावा घेतील. सीसीटीव्ही सुरू आहे की नाही, त्याची खात्री करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
शेवटचा ट्रक दुपारी अडीचला
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्राचा ट्रक सर्वात शेवटी दुपारी अडीच वाजता रमनमळा येथे दाखल झाला...
MT 25 Apr 2019, 4:00 am