अ‍ॅपशहर

मद्यसाठा जप्त

गोवा बनावटीचे मद्य विक्रीसाठी घेऊन आलेल्या संशयिताला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून पकडले. पथकाने पाच लाख ८८ हजार रुपयांचे मद्य जप्त केले.

Maharashtra Times 18 Mar 2018, 3:17 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the liquor seized
मद्यसाठा जप्त


गोवा बनावटीचे मद्य विक्रीसाठी घेऊन आलेल्या संशयिताला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून पकडले. पथकाने पाच लाख ८८ हजार रुपयांचे मद्य जप्त केले. अधीक्षक गणेश पाटील यांच्या आदेशानुसार पथकाने शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी हांदेवाडी (ता. आजरा) येथे ही कारवाई केली. महाराष्ट्र सरकारचा महसूल चुकवून गोवा व कर्नाटकातील मद्य कोल्हापूर जिल्ह्यात आणून विकणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांना मिळाली होती. हांदेवाडी येथे गोवा बनावटीचा देशी-विदेशी मद्यसाठा असल्याची खात्री झाल्यानंतर पथकाने छापा टाकून कारवाई केली. कारवाईत पाच लाख ८८ हजार रुपयांचे मद्याचे १२४ बॉक्स जप्त केले. निरीक्षक अरुण कोळी, दुय्यम निरीक्षक ए. जी. पाटील, कॉन्स्टेबल दिलीप दांगट, विशाल भोई, अर्जुन जाधव, अभिजित थोरात, सुनील कलाल, अमर पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज