अ‍ॅपशहर

फटाके उडविल्यावरूनदोन गटात हाणामारी

कोरोची येथील लोकमान्यनगर परिसरात ग्रामपंचायत निवडणूक वाद आणि फटाके फोडल्याच्या कारणातून तलवार व काठीने झालेल्या हाणामारीत आठजण जखमी झाले.

Maharashtra Times 7 Nov 2017, 3:00 am
इचलकरंजी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two group quaralls
फटाके उडविल्यावरूनदोन गटात हाणामारी


कोरोची येथील लोकमान्यनगर परिसरात ग्रामपंचायत निवडणूक वाद आणि फटाके फोडल्याच्या कारणातून तलवार व काठीने झालेल्या हाणामारीत आठजण जखमी झाले. यावेळी घरातील प्रापंचिक साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. या प्रकरणी शहापूर पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

लोकमान्यनगर परिसरात पांडुरंग पाटील तसेच नितीन आनंदा सुर्यवंशी हे शेजारी राहतात. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत या दोघांमध्ये काही कारणातून वाद निर्माण झाला होता. त्यातूनच सुर्यवंशी यांनी पाटील यांच्या दारात फटाके वाजवल्याने वाद चिघळला होता. फटाके का वाजवले याचा जाब विचारण्यासाठी पांडुरंग पाटील व त्यांचा मुलगा विकास हे गेला असता नितीन आनंदा सुर्यवंशी, अनिल खरसे, प्रकाश कडुलकर, आनंदा सुतार, सतिश सुर्यवंशी, आनंदा सुर्यवंशी, विकास सुर्यवंशी व अन्य पाच ते सहाजणांनी या दोघांना लाथाबु्क्क्यांनी मारहाण केली. यावेळी आनंदा सुतार याने विकास याच्या हातावर तलवारीने वार केल्याने तो जखमी झाला. तसेच पांडुरंग पाटील यांमयासह वाद सोडविण्यास आलेल्या प्रकाश पाटील व त्यांचा मुलगा रामचंद्र या दोघांनाही काठीने मारहाण करण्यात आल्याने तेही जखमी झाले आहेत, अशी फिर्याद पांडुरंग पाटील यांनी दिली आहे.

तर नितीन सुर्यवंशी याने दिलेल्या फिर्यादीत पांडुरंग पाटील यांच्यासह सहाजणांनी फटाके का वाजविले अशी विचारणा करत नितीन याच्यासह त्याची आई लक्ष्मी सुर्यवंशी, आनंदा सुर्यवंशी, विकास सुर्यवंशी व आनंदा सुतार यांना तलवारीने वार केल्याने चौघेजण जखमी झाले. या प्रकरणी पांडुरंग पाटील यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज