कोल्हापूर: शहरात जाहिरातींसाठी अनधिकृत फलक लावल्यास संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या इस्टेट विभागाने दिला आहे. महापालिकेने पाच वर्षांसाठी जाहिरात प्रसिद्धीबाबत महासभेत ठराव केला आहे. त्यानुसार शहरात अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर्स लावल्यास गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी शुल्क भरुन परवाना घेणे आवश्यक आहे. मात्र अशी परवानगी न घेता जाहिरात प्रसिद्ध केल्यास २४ मेपासून शहर विद्रुपीकरण कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशा स्वरुपाची कारवाई टाळण्यासाठी शुल्क भरुन परवाना घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या इस्टेट विभागाच्यावतीने केले आहे.
अनधिकृत फलक लावल्यास गुन्हा
शहरात जाहिरातींसाठी अनधिकृत फलक लावल्यास संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा महापालिकेच्या इस्टेट विभागाने दिला आहे...
MT 23 May 2019, 4:00 am