अ‍ॅपशहर

करोनाच्या संकटात केंद्राने मदतीत हात आखडता घेतलाः वडेट्टीवार यांची टीका

सांगली जिल्ह्यातील करोना संसर्ग आणि संभाव्य पूरस्थितीचा मंत्री वडेट्टीवार यांनी आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'करोना संसर्गाच्या काळात देशातील सर्वच राज्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2020, 10:35 pm
म. टा. प्रतिनिधी, सांगलीः 'जगभरातील अनेक देशांनी करोना संसर्गाच्या काळात नागरिकांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करून मदत केली. आपल्या देशात मात्र केंद्र सरकारने संकटाच्या काळात नागरिकांना मदत करण्यात हात आखडता घेतला,' अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. याशिवाय राज्याला केंद्राकडून पीएम केअर फंडातून केवळ १३८ कोटी रुपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ते गुरुवारी सांगली येथे पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vijay wadettiwar


सांगली जिल्ह्यातील करोना संसर्ग आणि संभाव्य पूरस्थितीचा मंत्री वडेट्टीवार यांनी आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'करोना संसर्गाच्या काळात देशातील सर्वच राज्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले. या काळात केंद्र सरकारने सर्व राज्यांना मदत करणे अपेक्षित होते. जगातील १३ देशांनी नागरिकांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली. मोदी सरकारने मात्र संकट काळात नागरिकांना मदत करण्यात हात आखडता घेतला. अजूनही मोदी सरकारकडून अपेक्षित मदत होत नाही. महाराष्ट्राला पीएम केअर फंडातून केवळ १३८ कोटी रुपये मिळाले. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतील ३९८ कोटी रुपये खर्च केले आहेत. यापुढेही राज्य सरकारकडून नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरूच राहील.'

वाचाः करोनाशी लढा: मुंबई पोलीस दलात केले 'हे' मोठे फेरबदल

संभाव्य पूरस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनच्या उपाययोजनांबाबत बोलताना मंत्री वडेट्टीवार म्हणाले, 'सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी तातडीने सरकारकडून बोटी दिल्या जाणार आहेत. सांगलीसाठी ४२, सातारा ८, तर कोल्हापूरसाठी २५ बोटी देण्याचे नियोजन राज्य सरकारने केेले आहे. यातील काही बोटी जुलै महिनाअखेरपर्यंत उपलब्ध होतील. पूरस्थितीत सांगली शहरासाठी एनडीआरएफचे एक पथक, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी एक स्वतंत्र पथक दिले जाणार आहे. गेल्या वर्षातील पूरग्रस्तांची प्रलंबित नुकसान भरपाई देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याकडे आर्थिक टंचाई असली तरी, मदत व पुनर्वसन खात्याच्या कामांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

वाचाः वाढदिवस साजरा झाला अन् दुसऱ्याच दिवशी तिच्यावर काळाचा घाला

३१३७७ कुटुंबांचे करणार स्थलांतर

पूरस्थिती उद्भवताच सांगली जिल्ह्यातील वाळवा शिराळा, पलूस आणि मिरज तालुक्यातील ३१३७७ कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले जाणार आहे. यासाठी १२० ठिकाणे निश्चित केली आहेत. पूरबाधित क्षेत्रातील व्यक्तींसह जनावरांचाही सर्व्हे पूर्ण झाला आहे. पुरामध्ये कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे, असे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज