अ‍ॅपशहर

भाजपचं बेरजेचं राजकारण; जनसुराज्य पक्ष महायुतीत

शिवसेनेशी युती तुटल्यानंतरही छोट्या-मोठ्या पक्षांना स्वत:सोबत ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपप्रणीत महायुतीची ताकद आणखी वाढली आहे. कोल्हापूरचे दिग्गज नेते व माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष महायुतीत सहभागी झाला आहे. 'जनसुराज्य'च्या साथीमुळं लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Times 26 Oct 2016, 1:55 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vinay kores jansurajya shakti party join hands with bjp led mahayuti
भाजपचं बेरजेचं राजकारण; जनसुराज्य पक्ष महायुतीत

शिवसेनेशी युती तुटल्यानंतरही छोट्या-मोठ्या पक्षांना स्वत:सोबत ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपप्रणीत महायुतीची ताकद आणखी वाढली आहे. कोल्हापूरचे दिग्गज नेते व माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष महायुतीत सहभागी झाला आहे. 'जनसुराज्य'च्या साथीमुळं लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जनसुराज्य पक्षाला महायुतीत आणण्यासाठी पुढाकार घेतला होता, असं सांगितलं जात आहे. विनय कोरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोणतीही अपेक्षा न ठेवता आम्ही महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी भेटीनंतर सांगितलं. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील नगरपालिका निवडणुकीत भाजप, जनसुराज्य शक्ती पक्षाशी आघाडी करणार आहे. महायुतीत सध्या भाजप, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम हे पक्ष आहेत.

कोल्हापुरातून खासदार संभाजीराजे भोसले यांना भाजपनं राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवलं आहे. शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीतसिंग घाटगे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या दिग्गजांनंतर भाजपनं आता विनय कोरे यांच्याशी नातं जोडून राज्यात बेरजेचं राजकारण करण्याचे संकेत दिले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज