कोल्हापूर : मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील दत्त मंदिर येथे रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तरुण आणि तरुणी विष प्यायल्याने बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. स्थानिक नागरिकांनी त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून सायंकाळी सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
तरुण, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
मलकापूर (ता शाहूवाडी) येथील दत्त मंदिर येथे रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तरुण आणि तरुणी विष प्यायल्याने बेशुद्ध अवस्थेत आढळून आले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jun 2019, 4:00 am