अ‍ॅपशहर

केंद्राचा सोया पेंड आयातीचा विचार नाही; सोयाबीन उत्पादकांसाठी चांगली बातमी

शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना भेट घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान याची सविस्तर माहिती दिली

Maharashtra Times 8 Dec 2021, 8:13 am
लातूर : राज्यात लातुर हा सोयाबीन उत्पादक अग्रेसर जिल्हा आहे. मागील काळात देशातील पोल्ट्री व्यावसायिकांनी लॉबी करून सोयाबीन पेंड आयातीला परवानगी मिळवली असताना यास मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली होती. आता यास पूर्णविराम मिळाला आहे. खुद्द वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम soyabean rate today latur


देशात महाराष्ट्र सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे. पोल्ट्री व्यावसायिकांनी कोंबड्याच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे. म्हणून लॉबिंग करून १२ लाख मेट्रिक टन सोया पेंडीच्या आयतीचा निर्णय घेतला होता. त्यापैकी साडे सहा लाख मेट्रिक टन सोया पेंड आयात झाली आहे. उर्वरित सोया पेंड आयात करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी मागील काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.

Omicron Symptoms: ओमिक्रॉन बाधितांमध्ये मुलांची संख्या अधिक; दिसताहेत 'ही' गंभीर लक्षणे
शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना भेट घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान याची सविस्तर माहिती दिली. यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सोया पेंडीच्या आयातीचा केंद्राचा विचार नाही असं ट्विट केल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज