अ‍ॅपशहर

कर्जाच्या डोंगरापुढे आयुष्य दिसेना, तरुण शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

निसर्गाने दगा दिल्याने खरीपाचे हातातोंडाशी आलेले पिके डोळ्यादेखत सडून गेल्याने बँक ऑफ महाराष्ट्र आणि जिल्हा मध्यवर्ती या दोन बँकेकडून घेतले आठ लाख रूपये कर्ज कसे फेडावे या विवंचणेतून अजय बन यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचले.

Maharashtra Times 8 Nov 2021, 10:02 am
लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव येथील २४ वर्षीय तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. डोक्यावर दोन बँकेचं आठ लाखाचं कर्ज, त्यात अतिवृष्टीमुळे शेतातील सर्व पीक सडून गेलं, आता हे कर्ज फेडायचं कसं या चिंतेतून आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवत या तरुणाने बॅरेजमधून उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. अजय विक्रम बन असं या तरुणाचं नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम latur news today live young farmer commits suicide due to debt
कर्जाच्या डोंगरापुढे आयुष्य दिसेना, तरुण शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल


अजय बन यांची डोंगरगाव येथील नदी पाञाच्या काठावर चार एकर जमीन आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने चार एकरवरील सर्वच खरीप पिके पाण्यात गेल्याने संपूर्णपणे सडली होती. हजारो रूपयाचे बियाणे घालून पेरणी केली. माञ, निसर्गाने दगा दिल्याने खरीपाचे हातातोंडाशी आलेले पिके डोळ्यादेखत सडून गेल्याने बँक ऑफ महाराष्ट्र आणि जिल्हा मध्यवर्ती या दोन बँकेकडून घेतले आठ लाख रूपये कर्ज कसे फेडावे या विवंचणेतून अजय बन यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचले.

समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्स व्यवसायात?; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
नदीकाठावरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने नुकसानभरपाई जाहीर केली. माञ, अजय बन यांना फक्त चार एकरचे केवळ सात हजार रूपयेच मदत मिळाली आहे. दिवाळीसारखा मोठा सण सुध्दा या शेतकऱ्याने आर्थिक परिस्थितीमुळे साजरा केला नाही.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे प्रेत पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठविले असून शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पश्चात आई वडील पत्नी एक सहा महिण्याचा मुलगा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज