अ‍ॅपशहर

पोलिसांच्या ताब्यातील 40 लाखांचा गुटखा चोरीला, काय बोलायचं आता!

पोलिसांच्या ताब्यातील जवळपास 40 लाख 32 हजार रुपयांचा गुटखा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लातुरच्या MIDC पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 21 Jan 2022, 5:06 pm
मुंबई : तीन महिन्यापूर्वी धडाकेबाज कारवाई करत सहाय्यक पोलिस अधिक्षक अनिकेत कदम यांनी लातुरात धाड टाकून सहा गोदामातून तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला होता. जप्त केलेला हा गुटखा सील करून ज्या ठिकाणी ठेवण्यात आला होता त्या एमआयडीसी परिसरातील गोदाम फोडून चोरट्यांनी 40 लाख 32 हजार रुपयांचा गुटखा चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra latur crime news gutkha stolen from police


ही घटना लक्षात येताच आरोपींच्या शोधात पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. रात्री एक वाजता लातुरच्या MIDC पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 जणांना ताब्यात घेण्यात आले असून चोरीस गेलेला काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लातूर शहर पोलीस अधीक्षक ऑक्टोबर महिन्यात रजेवर गेल्यामुळे शहर पोलीस अधिक उपाधिक्षक पदाचा पदभार सहाय्यक पोलिस अधिक्षक अनिकेत कदम यांच्याकडे देण्यात आला होता. या काळात कदम यांनी धडाकेबाज कारवाई करत गोलाई परिसरातील एका किराणा दुकानात कारवाई करत सुरुवातीला अकरा लाखांचा गुटखा जप्त केला होता. त्यानंतर याच दुकानाचा मालकाच्या मालकीच्या शहरातील सहा गोदामात धाडी टाकून तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गुटखा जप्त करून गुटका माफिया यांना हादरा दिला होता. विशेष बाब म्हणजे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने सव्वा कोटी रुपयांचा गुटखा सील करून एमआयडीसी परिसरातील प्लॉट नंबर 141 या जागेतील पत्र्याच्या एका गोदामात ठेवला होता. या मुद्देमालाची राखण करण्यासाठी पोलिस प्रशासनातील गार्डची देखील नियुक्त करण्यात आली होती. परंतु चोरट्याची हिंमत इतकी की त्यांनी पोलिसांच्या ताब्यात असलेला हा गुटखा गोदामाचा पत्रा कापून चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून रात्री एक वाजता लातूरच्या MIDC पोलीस ठाण्यात भादंवि 454, 457, 380, 328, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज