अ‍ॅपशहर

पत्नीचा गळा चिरुन फरार झालेला आरोपी 12 तासाच्या आत पोलिसांच्या ताब्यात

Latur Crime news : लातूर शहरातील अवंती नगरमध्ये पत्नीचा गळा चिरून फरार झालेला आरोपी हाताला झालेली जखम दाखवायला खाजगी दवाखान्यात गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 9 Feb 2022, 6:41 pm
लातूर : लातूर शहरातील अवंती नगरमध्ये पत्नीचा गळा चिरून फरार झालेला आरोपी हाताला झालेली जखम दाखवायला खाजगी दवाखान्यात गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला. लातूर पोलिसांनी उदगीरमधून अवघ्या 12 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra latur crime news Police arrested accused in murder of his wife


माहेरी असलेल्या पत्नीचा अब्दुल शेख या 24 वर्षीय तरुणाने काल दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी गळा चिरुन खून केला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडताच तो घटनास्थळावरुन पसार झला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पत्नीचा गळा कापताना झालेल्या झटापटीत अब्दुल शेखच्या हाताला जखम झाली होती. पत्नी रेश्माचा जागीच मृत्यू झाला होता. पती अब्दुल शेख तिथून फरार होऊन थेट उदगिरला पोहोचला. तिथे तो हाताच्या जखमेवरील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात गेला.

तपासाचा वेग वाढविलेले लातूर पोलीस मागावर होतेच. अब्दुल हातावर उपचार घेत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती उप विभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी दिली. अशा प्रकारे पत्नीचा गळा चिरुन फरार झालेल्या आरोपीच्या 12 तासाच्या आत पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

महत्वाचे लेख