अ‍ॅपशहर

विलासरावांचा सच्चा साथीदार गेला, देशमुख काकांच्या निधनाने लातूरवर शोककळा

ज्येष्ठ नेते लातूरचे माजी नगराध्यक्ष जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष एस आर देशमुख (काका) यांचे ५ जून रोजी रविवारी सकाळी ७ वाजता पूणे येथील रुग्णालयात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या दुःखद निधनाने विकासाचा महामेरू हरवला आहे, अशा भावना शहरातील अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byप्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2022, 3:45 pm
लातूर : लातूरच्या राजकारणात समाजकारणात वेगळी छाप असणारे, लोकांच्या कार्यासाठी सतत झटणारे बहारदार व्यक्तिमत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लातूरचे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष एस.आर.देशमुख (काका) यांचे ५ जून रोजी रविवारी सकाळी ७ वाजता पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी ६ जून रोजी सकाळी १० वाजता लातूर येथील मारवाडी स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. एस.आर.देशमुख हे दिवंगत विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय होते. एस. आर. देशमुखांना विलासराव देशमुखांचा सच्चा साथीदार म्हणून ओळखले जात असे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra latur news senior congress leader sr deshmukh passes away
विलासरावांचा सच्चा साथीदार गेला, देशमुख काकांच्या निधनाने लातूरवर शोककळा


एस आर देशमुख यांच्या निधनानंतर अमित विलासराव देशमुख यांनी देखील ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. 'लातूरचे माजी नगराध्यक्ष, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एस.आर.देशमुख यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.!


सासवडमधील दुहेरी हत्या प्रकरणाच्या तपासात नवा ट्विस्ट; तपास अधिकारी बदलला
दिवंगत एस आर देशमुख यांच्या पश्चात ४ भाऊ, ३ मुली १ मुलगा असा मोठा परिवार आहे एस आर देशमुख (काका) यांच्या दुःखद निधनाने विकासाचा महामेरू हरवला आहे, अशा भावना शहरातील अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज