अ‍ॅपशहर

११ वर्षीय मुलीवर वृद्धाचे अत्याचार

आग्रीपाडा येथे मोहम्मद तांबे या ६० वर्षांच्या वृद्धाने ११ वर्षीय मुलीवर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

Maharashtra Times 22 Apr 2018, 6:39 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime


आग्रीपाडा येथे मोहम्मद तांबे या ६० वर्षांच्या वृद्धाने ११ वर्षीय मुलीवर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

या मुलीस चॉकलेटचे आमिष दाखवून तांबे तिच्यावर अत्याचार करत होता. कुणाला याबाबत सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देत असल्याने ही मुलगी अत्याचार सहन करत होती. कुटुंबापासून वेगळा राहणारा तांबे खासगी कंपनीत नोकरीस होता. तीन दिवसांपूर्वी इमारतीजवळ या मुलीशी अत्याचार करताना त्याला काही रहिवाशांनी पाहिले. त्यांनी मुलीच्या पालकांना ही बाब सांगितल्यावर त्यांनी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. यानंतर तांबेने परिसरातून पळ काढला. परंतु, पोलिसांनी त्यास शोधून अटक केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज