अ‍ॅपशहर

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २७ ते २९ मार्चपर्यंत १५ टक्के पाणीकपात, या विभागांना फटका बसणार

Mumbai Water Supply News : मुंबईतील पूर्व उपनगरे व शहरातील काही भागात १५ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात तीन दिवस पाणी कपात करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स 28 Mar 2023, 10:34 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरू असताना मुलुंड जकात नाका परिसरातील पालिकेच्या २ हजार ३४५ मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीस हानी पोहोचली आहे. त्यातून गळती होऊ लागल्याने पिसे-पांजरापूर संकुलातून पाणी वाहून आणणाऱ्या या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी २७ मार्च रात्री १० वाजल्यापासून २९ मार्च रात्री १० वाजेपर्यंत पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील बहुतांश परिसरात १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nal2
मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! बुधवारपर्यंत 'या' भागात १५ टक्के पाणीकपात


पूर्व उपनगरांतील मुलुंड पूर्व व पश्चिम विभाग, भांडुप, नाहूर, कांजुरमार्ग व विक्रोळी पूर्व विभाग, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम विभाग, कुर्ला पूर्व विभाग, गोवंडी, चेंबूरचा काही परिसर, एम पश्चिममधील माहुल ते सोमय्या नाल्यापर्यंतचा परिसर तसेच शहर भागातील फोर्ट, मरीन ड्राइव्ह, पी. डीमेलो रोड, कुलाबासह अन्य परिसर, बी विभागातील सँडहर्स्ट रोड परिसर, भायखळा, एफ दक्षिणमधील परळ, लालबाग, तसेच एफ उत्तरमधील शीव, वडाळा, माटुंगा भागात १५ टक्के पाणीकपात असणार आहे.

महत्वाचे लेख