अ‍ॅपशहर

२१ वर्षीय प्राजक्ताचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

सहा महिन्यांपूर्वीच नोकरीसाठी मुंबईत आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका २१ वर्षीय तरुणीला व तिच्या मित्राला दादर रेल्वे स्थानकात रुळ ओलांडताना जीव गमवावा लागला आहे. प्राजक्ता सदानंद ढोलम असे या तरुणीचे नाव असून ती मालवणमधील आडारीवाडी येथील आहे.

Maharashtra Times 17 Jul 2017, 9:17 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 year old sindhudurg girl crushed to death by train in dadar mumbai
२१ वर्षीय प्राजक्ताचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू


सहा महिन्यांपूर्वीच नोकरीसाठी मुंबईत आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका २१ वर्षीय तरुणीला व तिच्या मित्राला दादर रेल्वे स्थानकात रुळ ओलांडताना जीव गमवावा लागला आहे. प्राजक्ता सदानंद ढोलम असे या तरुणीचे नाव असून ती मालवणमधील आडारीवाडी येथील आहे.

प्राजक्ता बदलापूर येथे राहत होती तर परळ येथील हाफकीनमध्ये सहा महिन्यांपूर्वीच तिला जॉब मिळाला होता. त्यामुळे बदलापूर-परळ-बदलापूर असा तिचा नेहमीचा प्रवास होता. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी मित्र-मैत्रीणींच्या ग्रुपसह कामावरून घरी परततानाच तिला मृत्यूने गाठले. परळहून दादरला आल्यानंतर प्लॅटफॉर्म बदलायचा असल्याने या सर्वांनी जिना न चढता रुळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून भरधाव आलेल्या ट्रेनच्या धडकेत प्राजक्ता आणि तिच्या अन्य एका मित्राचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले.

एकुलती एक मुलगी

प्राजक्ता ही सदानंद ढोलम यांची एकुलती एक मुलगी होती. आडारीवाडीतील भंडारी हायस्कूलमध्ये तिचं प्राथमिक शिक्षण झालं तर टोपीवाला कॉलेजमध्ये तिचं पुढचं शिक्षण झालं. दरम्यान, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये रेफ्रिजरेटर-एसी डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर ती सहा महिन्यांपूर्वीच मुंबईत आली होती. सुरुवातीला बदलापूर येथे काकांकडे तिचा मुक्काम होता. मात्र, हाफकीनमध्ये नोकरी मिळाल्यानंतर तिने बदलापुरातच भाडेतत्त्वावर घर घेतलं. तिथे आई-वडिलांनाही तिने गावाहून आणलं. मात्र सगळं काही सुरळीत चाललं असतानाच तिच्या अपघाती मृत्यूने ढोलम कुटुंबाचा आधारवडच हरपला आहे. दरम्यान, प्राजक्तावर रविवारी आडारीवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज