अ‍ॅपशहर

महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येत घट; 'हा' आकडा दिलासादायक

महाराष्ट्रात कालच्या तुलनेत रविवारी नवीन रुग्ण संख्येत घट, गेल्या २४ तासात ६६९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू, दिवसभरात ५६ हजार ६४७ नवे रुग्ण (coronavirus in maharashtra)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2021, 9:00 am
मुंबईः राज्यात आज ५६ हजार ६४७ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. तर, ६६९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम covid 19


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. राज्यातील शनिवारच्या तुलनेत नवी रुग्णसंख्येत कमालीची घट दिसत आहे. तसंच, करोनाबाधित मृतांचा आकडाही नियंत्रणात आला असल्याचं चित्र आहे.

पंढरपुरात महाविकास आघाडीचा पराभव का झाला?; राष्ट्रवादीनं दिलं उत्तर

आज राज्यात ५६ हजार ६४७ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर, आज दिवसभरात ५१ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं आजपर्यंत एकूण ३९ लाख ८१ हजार ६५८ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्णबरे होण्याचे प्रमाण ८४. ३१ टक्के इतके झाले आहे.

गेल्या २४ तासांत ६६९ रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळं सध्या राज्यातील मृत्यूदर १. ४९ टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७० हजार २८४ रुग्णांचे करोनामुळं प्राण दगावले आहेत.

सरकारचा योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम; पंढरपुरच्या विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया


अॅक्टिव्ह रुग्ण

महाराष्ट्रात सध्या ६ लाख ६८ हजार ३५३ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या२, ७६, ५२, ७५ चाचण्यांपैकी ४७ लाख २२ हजार ४०१ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर, राज्यात सध्या ३९ लाख ९६ हजार ९४६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, २७ हजार ७३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज