अ‍ॅपशहर

पवई तलावात हाऊसबोट उलटली; तिघे बेपत्ता

मुंबईतील पवई तलावात शुक्रवारी रात्री हाऊस बोट उलटून आठजण पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. त्यापैकी पाचजणांना वाचवण्यात यश आले असून तिघे अद्यापही बेपत्ता आहेत.

Maharashtra Times 24 Dec 2016, 10:20 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a boat capsized in a lake in mumbais powai
पवई तलावात हाऊसबोट उलटली; तिघे बेपत्ता


मुंबईतील पवई तलावात शुक्रवारी रात्री हाऊस बोट उलटून आठजण बुडाल्याची घटना घडली आहे. त्यापैकी पाचजणांना वाचवण्यात यश आले असून तिघे अद्यापही बेपत्ता आहेत.

शुक्रवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही घटना घडली. पाण्यात बुडालेले सर्व लोक पार्टी करण्यासाठी जात होते. एका खडकाला अडकून त्यांची हाऊसबोट उलटल्याचं सांगितलं जातं. बेपत्ता लोकांचा शोध सुरू असल्याचं समजतं.

पवई तलावात हाऊसबोट वापरण्यास बंदी आहे. असं असतानाही हाऊसबोट पाण्यात कशी घातली गेली? त्यासाठी संबंधितांना कोणी परवानगी दिली?; याचीही चौकशी सुरू आहे. 5 rescued and 3 missing after a boat capsized in a lake in Mumbai's Powai late last night. Search operations underway (earlier visuals) pic.twitter.com/UkS3cjzMAA — ANI (@ANI_news) December 24, 2016

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज