अ‍ॅपशहर

वरळीत आदित्य ठाकरे यांना धक्का? सेना पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Worli Shivsena : वरळीचा श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लाडका मार्केटचा राजाच्या स्वागत कमानीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पोस्टर लावण्यात आले होते.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 3 Sep 2022, 8:20 am
मुंबई : शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी त्यांचा मोर्चा आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघाकडे वळवला आहे. वरळीतील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांची गुरुवारी भेट घेतली. येत्या काही दिवसांत या मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Aditya thackeray shivsena
आदित्य ठाकरे


आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॅनरबाजीही नुकतीच पाहायला मिळाली. वरळी हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ आणि बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेत बंडखोरी झाली तेव्हाही वरळीतील एकही पदाधिकारी वा कार्यकर्ता शिंदे गटात गेला नव्हता. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी वरळीकडे मोर्चा वळवल्याचे दिसते.

एसटीच्या ८०० कंत्राटी चालकांना धक्का; महामंडळाने घेतला मोठा निर्णय

गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच वरळी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकल्याचे पहायला मिळाले. वरळीचा श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लाडका मार्केटचा राजाच्या स्वागत कमानीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर लावण्यात आले होते. इतकेच नाही तर यावर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असेही लिहिण्यात आले आहे. त्यानंतर गुरूवारी शिंदे यांची वरळी मतदारसंघातील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्याचे समजते.

या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांच्य प्रवेशाबाबतची प्रक्रिया सुरू झाल्याचेही समजते. असे प्रत्यक्षात झाल्यास आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातही शिवसेनेला धक्का बसणार हे निश्चित आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज