अ‍ॅपशहर

भाजपसाठी फक्त इलेक्शन फर्स्ट: आदित्य ठाकरे

वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्यात घाईघाईनं केलेल्या सुधारणांवरून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपचं नाव न घेता जोरदार टीका केली आहे. 'निवडणुकीत त्रास होऊ नये म्हणूनच एका पक्षानं जीएसटीमध्ये सुधारणा केल्या आहेत. त्यांच्या निर्णयाचा लोकांच्या हिताशी काही संबंध नाही. या पक्षासाठी 'नेशन फर्स्ट' नाही तर 'इलेक्शन फर्स्ट' झालं आहे,' असा टोला आदित्य यांनी हाणला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Dec 2017, 2:52 pm
मुंबई: वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्यात घाईघाईनं केलेल्या सुधारणांवरून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपचं नाव न घेता जोरदार टीका केली आहे. 'निवडणुकीत त्रास होऊ नये म्हणूनच एका पक्षानं जीएसटीमध्ये सुधारणा केल्या आहेत. त्यांच्या निर्णयाचा लोकांच्या हिताशी काहीही संबंध नाही. या पक्षासाठी आता 'नेशन फर्स्ट' नाही, तर 'इलेक्शन फर्स्ट' झालं आहे,' असा टोला आदित्य यांनी हाणला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aaditya thackeray takes jibe at bjp over changes in gst
भाजपसाठी फक्त इलेक्शन फर्स्ट: आदित्य ठाकरे


गुजरातच्या निवडणूक प्रचारात जीएसटीमुळं सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा काँग्रेसनं लावून धरला आहे. त्याची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारनं जीएसटी अंमलबजावणीच्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. तसंच, कररचनेत अनेक बदल करत व्यापाऱ्यांना काही सवलतीही जाहीर केल्या आहेत. हाच धागा पकडून आदित्य यांनी नाव न घेता भाजपवर टीका केली आहे. 'गुजरात निवडणुकीच्या आधीही लोकांना जीएसटीचा त्रास होत होता. मात्र, त्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं. आता निवडणुकीत त्रास होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर लगेच जीएसटीमध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळं या पक्षाचा 'नेशन फर्स्ट'चा मुखवटा फाटला आहे. त्यांच्यासाठी 'इलेक्शन फर्स्ट' आहे, हे दिसून आलंय,' असं ट्विट आदित्य यांनी केलं आहे.
गुजरात निवडणुकीच्या आधी, GST मध्ये सुधार लोकांना त्रास होतोय म्हणून नाही केला, एका पक्षाला निवडणुकीत त्रास होईल असं दिसायला लागलं म्हणून केला. Nation First नाही, आता त्यांच्या साठी Election First झालं आहे. कदाचित मुखवटा फाटला, Nation First campaign चा. — Aaditya Thackeray (@AUThackeray) December 7, 2017 दोन दिवसांपूर्वीही आदित्य यांनी ट्विटद्वारे भाजपला टोला हाणला होता. पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळ गुजरात निवडणुकीच्या प्रचारात उतरलंय. मग देश कोण चालवतोय, असा सवाल त्यांनी केला होता. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी त्यास प्रत्युत्तरही दिले होते. आता आदित्य यांच्या नव्या टीकेवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज