अ‍ॅपशहर

'आशीष शेलार हे घोटाळ्यांचे महारथी'

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरकारने जी तत्परता दाखवली, ती तत्परता सरकारने भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या बाबतीत का नाही दाखवली, असा सवाल करीत, आशिष शेलार यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला असून ते तर घोटाळ्यांचे महारथी आहेत, असा आरोप 'आप'च्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी केला.

Maharashtra Times 18 Jun 2017, 1:11 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aap leader preeti sharma menon allegations on ashish shelar
'आशीष शेलार हे घोटाळ्यांचे महारथी'


राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरकारने जी तत्परता दाखवली, ती तत्परता सरकारने भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या बाबतीत का नाही दाखवली, असा सवाल करीत, आशिष शेलार यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला असून ते तर घोटाळ्यांचे महारथी आहेत, असा आरोप 'आप'च्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी केला.

आशीष शेलार यांची जी रिद्धी कंपनी आहे. त्या कंपनीने कोणताही व्यवसाय न करता कोट्यवधी रुपये कमावल्याचे दाखवले आहे. जुलै २०१६ मध्ये आशीष शेलार यांच्याविरुद्ध 'आप'ने मनी लॉन्ड्रिंगची तक्रार केली होती. परंतु गेल्या वर्षभरानंतर एकाही तपास यंत्रणेने या तक्रारीची साधी दखलही घेतली नाही. उलट अंमलबजावणी संचालनायलाने (ईडी) काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या घरावर छापा टाकण्याची तत्परता दाखवली. इतर नेत्यांच्याविरोधात जी तत्परता दाखवली तीच तत्परता आशीष शेलार यांच्या बाबतीत का नाही दाखवली, त्यांना संरक्षण का दिले जातेय, असा सवाल प्रीती शर्मा-मेनन यांनी उपस्थित केला.

हे आरोप म्‍हणजे शिळया कढीला उत

माझ्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप करण्यात आले आहेत ते म्हणजे शिळ्या कढीला उत आहे. हे सर्व आरोप जुनेच असून याबद्दल मी कागदपत्रासह पत्रकार परिषद घेवून खुलासा केलेला आहे, असे स्पष्टीकरण आशीष शेलार यांनी दिले. सर्वेश्‍वर आणि रिध्‍दी या दोन कंपन्‍यांच्‍या नावे माझ्यावर आरोप करण्‍यात आले, परंतु, माझा आता या कंपन्‍यांशी कोणताही संबंध नाही. माझी कुणाशीही पार्टनरशिप नाही. तसेच मी कुठल्‍याही कंपनीत संचालक मंडळावर नाही. त्‍यामुळे त्‍या कंपन्‍यांमधील अन्‍य कोणा व्‍यक्‍तीचे अन्‍य कुणाशी असलेल्‍या व्‍यवहाराशी माझा संबंध नाही, असे शेलार यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज