अ‍ॅपशहर

आजपासून रेल्वे तिकीट स्वस्त; एसी, प्रथम श्रेणीच्या तिकीट दरांत घट

एसटी लोकलचे दर निम्म्याने कमी करण्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. आता या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. प्रवाशांच्या माहितीसाठी तिकीट खिडक्यांवर या गाड्यांचे वेळापत्रक आणि तिकिटांचे दर लावण्यात येणार आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स 5 May 2022, 7:02 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीचे दर निम्मे करण्याची घोषणा झाल्यानंतर आज, गुरुवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे. एसी लोकलला प्रोत्साहन देण्यासाठी तिकीट खिडक्यांवर या गाड्यांचे वेळापत्रक आणि तिकिटांचे दर लावण्यात येणार आहेत. ऐन उन्हाळ्यात वातानुकूलित रेल्वे प्रवास स्वस्त झाल्याने प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ac local train fare in mumbai first class train ticket price
आजपासून रेल्वे तिकीट स्वस्त; एसी, प्रथम श्रेणीच्या तिकीट दरांत घट


प्रवाशांना वातानुकूलित लोकलच्या वेळा तसेच त्यांचे तिकीट दर सहज कळावेत, यासाठी वाणिज्य कार्यालयाला सूचना देण्यात आल्या आहेत. यात तिकीट खिडक्यांवरील दर्शनी भागात वेळापत्रक लावावे आणि शक्य त्या प्रकारे माहिती द्यावी, अशा सूचनांचा समावेश आहे. मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांत असे पत्रक लावण्यात येत आहेत. वातानुकूलित लोकलचे वेळापत्रक तसेच दरपत्रक रेल्वेच्या यूटीएस मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे. यूटीएस अॅपवरून तिकीट आणि पास खरेदी करण्याची सुविधा आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

'पुशर'चा वापर करणार?

शहर-उपनगरात प्रचंड उकाडा जाणवत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूककोंडीवर तोडगा अद्याप निघालेला नाही. वातानुकूलित प्रवास स्वस्त होणार असल्याने लोकलमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे. गर्दीमुळे लोकलचे दरवाजे बंद नाही झाल्यास आरपीएफ कर्मचारी प्रवाशांना आत ढकलण्यासाठी फलाटावर उभे करता येईल का, याबाबत विचार सुरू आहे. पहिल्या कार्यालयीन दिवसाच्या प्रतिसादानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज