अ‍ॅपशहर

भुळबळ आणि कुटुंबियांवर एसीबीकडून गुन्हा दाखल

अंमलबजावणी संचालनालयानंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंही ( एसीबी) अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. लाच घेणे आणि बेहिशेबी मालमत्ता बाळगण्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधन विभागानं हा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केलेल्यां मध्ये भुजबळांच्या कुटुंबियांचा देखील समावेश आहे. एसीबीनं उचललेल्या या कारवाईच्या पावलामुळं छगन भुजबळ यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे.

Maharashtra Times 26 May 2016, 11:36 pm
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम acb registered an fir against chhagan bhujbal and others
भुळबळ आणि कुटुंबियांवर एसीबीकडून गुन्हा दाखल

अंमलबजावणी संचालनालयानंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंही ( एसीबी) अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. लाच घेणे आणि बेहिशेबी मालमत्ता बाळगण्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधन विभागानं हा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केलेल्यां मध्ये भुजबळांच्या कुटुंबियांचा देखील समावेश आहे. एसीबीनं उचललेल्या या कारवाईच्या पावलामुळं छगन भुजबळ यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे.

ज्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा एकूण 12 जणांमध्ये छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, मीना छगन भुजबळ, विशाखा पंकज भुजबळ, सुनील दामोदर नाईक, संजीव विमलकुमार जैन, चंद्रशेखर मदनलाल सारडा, सुरेश ब्रह्मानंद जाजोदिया, प्रवीणकुमार हुकूमचंद जैन, कपिल राजप्रकाश पुरी आणि जगदीशप्रसाद भालचंद्र पुरोहित यांचा समावेश आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज