म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
माहीम येथील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर रविवारी सकाळी अॅसिडहल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आपल्याविरोधात तक्रार करू नये, यासाठी याआधी शिकणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हे कृत्य केल्याचा आरोप तरुणीच्या वडिलांनी केला आहे. पीडित मुलगी शाळेत असताना एका शिक्षकाने तिला त्रास दिला होता. याबाबत ती पोलिस ठाण्यात तक्रार करणार होती. ती पोलिसांत जाऊ नये म्हणून धमकाविण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून विक्रोळी पार्कसाइट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रोळी पार्कसाइट परिसरात राहणारी पीडित मुलगी माहीम येथील एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकते. कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी ती भांडुपमधील एका प्रसिद्ध शाळेत शिकत होती. रविवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली. यावेळी त्या शाळेचे मुख्याद्यापक आणि तीन शिक्षक याठिकाणी पोहोचले. तिन्ही शिक्षकांनी तिला पकडले व मुख्याध्यापकाने अंगावर अॅसिड फेकले. त्यानंतर भाजलेल्या स्थितीतच तिने वडिलांना फोन केला. त्यानुसार घटनास्थळी धाव घेत त्यांनी तिला आधी राजावाडी आणि नंतर सायन रुग्णालयात नेले. सायन रुग्णालयात उपचार करून सोडल्यानंतर याबाबत पार्कसाइट पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्पना पवार यांनी सांगितले.