अ‍ॅपशहर

मल्ल्यांनंतर आता मेहता!

उद्योगपती विजय मल्ल्या यांनी सुमारे नऊ हजार कोटी रुपये थकविल्याने त्यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सुरू केलेल्या कठोर कारवाईनंतर आता तब्बल ६८०० कोटी रुपये थकविणाऱ्या हिरेव्यापारी जतीन मेहता यांच्या विन्सम डायमंडस् अॅण्ड ज्वेलरीच्या मुंबई, बेंगळुरू, सुरत आणि राजस्थानातील कार्यालयांवर मंगळवारी ईडीने छापे घालून तब्बल १७२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

Maharashtra Times 1 Jun 2016, 4:00 am
६८०० कोटींची थकबाकी; ईडी छाप्यांत १७२ कोटीची मालमत्ता जप्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम action on jatin mehta
मल्ल्यांनंतर आता मेहता!

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

उद्योगपती विजय मल्ल्या यांनी सुमारे नऊ हजार कोटी रुपये थकविल्याने त्यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सुरू केलेल्या कठोर कारवाईनंतर आता तब्बल ६८०० कोटी रुपये थकविणाऱ्या हिरेव्यापारी जतीन मेहता यांच्या विन्सम डायमंडस् अॅण्ड ज्वेलरीच्या मुंबई, बेंगळुरू, सुरत आणि राजस्थानातील कार्यालयांवर मंगळवारी ईडीने छापे घालून तब्बल १७२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

या कंपनीच्या संयुक्त अरब अमिरातमधील १३ वितरकांकडून ४७६० कोटी रुपये येणे होते. मात्र, ती रक्कम त्यांना मिळू शकली नाही. त्याचा परिणाम म्हणून विन्सम डायमंडने तारण म्हणून ठेवलेली चार हजार कोटी रुपयांची हमी रक्कम स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँकेसह चार परेदशी बँकांनी रोखीत करून घेतली. कर्जफेड न केल्याने या कंपनीला बँकांनी थकबाकीदार जाहीर केले. या कंपनीची सीबीआयकडूनसुद्धा चौकशी सुरू आहे तर काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत ईडीतर्फे कारवाई सुरू केली आहे.

विन्सम डायमंड्सने स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेचे ४६८०.०४ कोटी रुपये आणि विन्मसची सहयोगी कंपनी फॉरएव्हर प्रेशिअस डायमंण्डस् अॅण्ड ज्वेलरी यांनी पंजाब नॅशनल बँकेचे २१२१.८२ कोटी रुपये थकविले आहेत. या थकबाकीची एकूण रक्कम विचारात घेता देशातील थकबाकीदारांमध्ये विन्मसचा थकबाकीदारांच्या यादीत वरचा क्रमांक लागतो. या कंपनीला कर्ज देणाऱ्यांमध्ये स्टेट बँक ऑफ मॉरिशस, एक्स्पोर्ट इंपोर्ट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि अॅक्सिस बँक यांचाही समावेश आहे. हेतुपूर्वक थकबाकी ठेवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मोहीम ईडीने सुरू केली असून, मालमत्ता जप्ती हा त्याचाच भाग आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज