अ‍ॅपशहर

धडक कारवाई!

पश्चिम उपनगरातील कांदिवली पूर्वेतील ठाकूर ​व्हिलेजसह काही परिसरांत मोठ्याप्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या असल्याची तक्रार कायम असते. त्यामुळे वाहतूककोंडीसह अनेक समस्यांनी उग्ररूप धारण केले आहे. या स्थितीत पालिकेच्या आर/दक्षिण कार्यालयाने शुक्रवारी रात्री उशिरा धडक मोहीम हाती घेतली. यात एका दिवसांत तब्बल ३४९ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.

Maharashtra Times 16 Jul 2017, 4:00 am
एकाच दिवशी ३४९ फेरीवाल्यांवर बडगा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम action taken
धडक कारवाई!

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

पश्चिम उपनगरातील कांदिवली पूर्वेतील ठाकूर ​व्हिलेजसह काही परिसरांत मोठ्याप्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या असल्याची तक्रार कायम असते. त्यामुळे वाहतूककोंडीसह अनेक समस्यांनी उग्ररूप धारण केले आहे. या स्थितीत पालिकेच्या आर/दक्षिण कार्यालयाने शुक्रवारी रात्री उशिरा धडक मोहीम हाती घेतली. यात एका दिवसांत तब्बल ३४९ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.

परिमंडळ ७चे उपायुक्त अशोक खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी पाच वाजता ही कारवाई हाती घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत केलेल्या कारवाईत ३४९ अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणे हटविली आहेत. त्यात २४५ अनधिकृत फेरीवाले, ७२ भाजी विक्रेते, ३२ खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा समावेश आहे. या कारवाईसाठी ४० पोलिसांसह पालिकेचे ४७ अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले होते. त्यासाठी एक जेसीबी, आठ अतिक्रमण निर्मूलन वाहने आदी यंत्रसामुग्री वापरण्यात आली.

या कारवाईमुळे ६० फुटी रोड, जानूपाडा, ९० फुटी रोड, १२० फुटी रोड, ग्रीन पार्क, एव्हरशाइननगर, समतानगर येथील वाहतूककोंडी फुटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

- साहेबराव गायकवाड, आर-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज