अ‍ॅपशहर

अभिनेता सुनील ग्रोवरला डेंग्यूची लागण

प्रसिद्ध विनोदी अभिनेता सुनील ग्रोवरला डेंग्यूची लागण झाली आहे. त्याच्यावर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सुत्रांनी सांगितलं.

Maharashtra Times 2 Sep 2017, 10:36 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम actor sunil grover down with dengue
अभिनेता सुनील ग्रोवरला डेंग्यूची लागण


प्रसिद्ध विनोदी अभिनेता सुनील ग्रोवरला डेंग्यूची लागण झाली आहे. त्याच्यावर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सुत्रांनी सांगितलं.

सुनील ग्रोवरला तीन दिवसांपासून ताप होता. त्यामुळे त्याची रक्त तपासणी करण्यात आली असता त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झालं. त्यानंतर त्याला एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये त्याच्या ‘डॉ. मशहूर गुलाटी’ आणि ‘रिंकू भाभी’च्या भूमिका गाजल्या होत्या. ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’मधील त्याची ‘गुत्थी’ची भूमिकाही गाजली होती. 'द कपिल शर्मा' शो दरम्यान त्याचं आणि कपिल शर्माचं वाजल्यानं त्याने हा शो सोडला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज