अ‍ॅपशहर

मीनाक्षी थापा हत्याप्रकरणी दोघे दोषी

अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या खटल्यातील दोघा आरोपींना सत्र न्यायालयाने बुधवारी दोषी ठरविले. त्यांच्या शिक्षेचा फैसला आज, गुरुवारी होणार आहे. अमित जयस्वाल व प्रीती सुरीन अशी या दोषींची नावे आहेत. जयस्वाल हा वकील असून त्याची मैत्रीण प्रीती ही ज्युनिअर आर्टिस्ट आहे.

Maharashtra Times 10 May 2018, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी,मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम meenakshi-thapa

अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्या खटल्यातील दोघा आरोपींना सत्र न्यायालयाने बुधवारी दोषी ठरविले. त्यांच्या शिक्षेचा फैसला आज, गुरुवारी होणार आहे. अमित जयस्वाल व प्रीती सुरीन अशी या दोषींची नावे आहेत. जयस्वाल हा वकील असून त्याची मैत्रीण प्रीती ही ज्युनिअर आर्टिस्ट आहे.

मीनाक्षी थापा हिने दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या चित्रपटांसह काही चित्रपटांमध्ये काम केले होते. आरोपींनी मीनाक्षीची भीषण हत्या करून तिचे शीर धडापासून वेगळे केले होते. डीएनए चाचणीमुळे तिच्या शवाची ओळख पटली होती. मीनाक्षी हिने आपण नेपाळच्या श्रीमंत कुटुंबातील असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आरोपींनी तिला मॉडेलिंगचे काम देण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून १३ मार्च, २०१२ रोजी गोरखपूरला नेले. तिच्या सुटकेसाठी त्यांनी तिच्या आईवडिलांकडे १५ लाख रुपयांची मागणी केली. ती रक्कम न मिळाल्याने तिची हत्या केली. प्रत्यक्षात मीनाक्षी ही श्रीमंत कुटुंबातील नसून तिचे वडील ओएनजीसीमध्ये नोकरी करीत होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज