अ‍ॅपशहर

'दारूबंदी, बीफ बॅनमुळे देशाचे मोठे नुकसान'

दारूबंदी आणि बीफ बॅनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे, असं गोदरेज उद्योग समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज म्हणालेत. विधानसभा निवडणुकींमुळे काही राज्यात दारूबंदी लागू होत आहेत तर काही राज्यात बीफ बॅनचे कडक पालन केले जात आहे.

Maharashtra Times 12 May 2016, 11:28 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम adi godrej says beef ban and liquor prohibition are hurting economy
'दारूबंदी, बीफ बॅनमुळे देशाचे मोठे नुकसान'


दारूबंदी आणि बीफ बॅनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे, असं गोदरेज उद्योग समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज म्हणालेत. विधानसभा निवडणुकींमुळे काही राज्यात दारूबंदी लागू होत आहेत तर काही राज्यात बीफ बॅनचे कडक पालन केले जात आहे. यापार्श्वभूमीवर आदी गोदरेज यांचं वक्व्य महत्त्वाचं मानलं जातंय.

केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारला दोन वर्ष पू्र्ण होत आहेत. या सरकारच्या धोरणांवर आदी गोदरेज यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका मांडली. 'जगात सर्वाधिक वेगाने विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था आहे आणि भारत लवकरच एक शक्तीशाली विकसित राष्ट्र म्हणून पुढे येईल. पण यात काही बाबींचा अडसर आहे. उदाहरणार्थ काही राज्यांमध्ये असलेले बीफ बॅन. यामुळे ग्रामीण आणि कृषी विकासावर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. कारण इतक्या गायींचं तुम्ही करणार तरी काय? याचा शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होतोय. कारण शेतकऱ्यांना यातून मोठं उत्पन्न मिळतं', असं गोदरेज म्हणाले.

'वैदिक काळात भारतीय बीफ खात होते. आपल्या धर्मात बीफला कुठलाही विरोध नाहीए. दुष्काळामुळे ही प्रक्रिया आधीपासूनच सुरू झाली होती. गायीची हत्या करू नका, तिचे दूध मुलांसाठी पोषक आहे, असं ज्येष्ठांकडून सांगितलं जात होतं. पण पुढे जाऊन हा बदल एका धार्मिक मान्यतेत झाला. पण वैदिक काळात भारतीय बीफ खात होते हेही तितकचं खरं आहे', असं गोदरेज म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज