अ‍ॅपशहर

आता फक्त आदित्य ठाकरे एकटेच उरले, शिवसेनेचे ९ मंत्री एकनाथ शिंदेच्या गटात

बंडखोर नेते एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीत सध्या ८ मंत्री आहेत. तर आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे एकमेव विधानसभेत निवडून आलेले मंत्री उरले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील आमदार आणि मंत्र्यांना थांबवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अपयश येताना दिसत आहे. एकापाठोपाठ एक शिवसेनेतील मंत्र्यांनी गुवाहाटीचा रस्ता धरला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलेलं की बंडखोर मंत्री आणि आमदारांवर कारवाई होणार, आता या मंत्र्यावर कशा पद्धतीने कारवाई केली जाणार हे पाहावं लागणार आहे.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jun 2022, 4:34 pm

हायलाइट्स:

  • शिवसेनेचे मंत्री उदय सामंत गुवाहाटीला रवाना
  • उदय सामंत शिंदे गटात सामील होण्याची शक्यता
  • शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी आदित्य ठाकरे हे एकमेव मंत्री

बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला दिवसेंदिवस धक्के बसत आहेत. आज सकाळपासून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे नॉट रिचेबल होते. त्यानंतर आता ते गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती पुढे आली आहे. आता शिवसेनेतील आणखी एक मंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेत निवडून आलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी आदित्य ठाकरे हे एकमेव मंत्री शिल्लक आहेत. उदय सामंत हे आदित्य ठाकरेंच्या जवळचे मानले जातात.
बंडखोर नेते एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीत सध्या ९ मंत्री आहेत. तर आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे एकमेव विधानसभेत निवडून आलेले मंत्री उरले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील आमदार आणि मंत्र्यांना थांबवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अपयश येताना दिसत आहे. एकापाठोपाठ एक शिवसेनेतील मंत्र्यांनी गुवाहाटीचा रस्ता धरला. त्यामुळे शिवसेनेचे अख्ख मंत्रिमडळं रिकामं झालं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलेलं की बंडखोर मंत्री आणि आमदारांवर कारवाई होणार, आता या मंत्र्यावर कशा पद्धतीने कारवाई केली जाणार हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा -एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यांना आणखी एक धक्का; आठवा मंत्री गुवाहाटीकडे रवाना

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या बंडखोरांच्या गटात सामील झालेले उदय सामंत हे शिवसेनेचे नववे मंत्री आहेत.

ते ९ मंत्री कोण?

  • एकनाथ शिंदे - नगरविकास मंत्री
  • उदय सामंत - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
  • गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा मंत्री
  • संदीपान भुमरे - रोजगार हमी मंत्री
  • शंभुराज देसाई - गृहराज्य मंत्री
  • अब्दुल सत्तार - राज्यमंत्री
  • बच्चू कडू - राज्यमंत्री
  • दादा भूसे - कृषिमंत्री
  • राजेंद्र यड्रावकर - राज्य आरोग्यमंत्री
गुवाहाटीत एकनाथ शिंदेंसोबत कोण-कोण?

हेही वाचा -उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट


  1. एकनाथ शिंदे
  2. उदय सामंत
  3. गुलाबराव पाटील
  4. संदीपान भुमरे
  5. शंभुराज देसाई
  6. अब्दुल सत्तार
  7. अनिल बाबर
  8. तानाजी सावंत
  9. चिमणराव पाटील
  10. प्रकाश सुर्वे
  11. भरत गोगावले
  12. विश्वनाथ भोईर
  13. संजय गायकवाड
  14. प्रताप सरनाईक
  15. राजकुमार पटेल
  16. राजेंद्र पाटील
  17. महेंद्र दळवी
  18. महेंद्र थोरवे
  19. प्रदीप जयस्वाल
  20. ज्ञानराज चौगुले
  21. श्रीनिवास वनगा
  22. महेश शिंदे
  23. संजय रायमूलकर
  24. बालाजी कल्याणकर
  25. शांताराम मोरे
  26. संजय शिरसाट
  27. दादा भूसे
  28. प्रकाश आबिटकर
  29. योगेश कदम
  30. आशिष जयस्वाल
  31. सदा सरवणकर
  32. मंगेश कुडाळकर
  33. दीपक केसरकर
  34. यामिनि जाधव
  35. लता सोनावणे
  36. किशोरी पाटील
  37. रमेश बोरणारे
  38. सुहासे कांदे
  39. बालाजी किणीकर
हेही वाचा -मग महाराष्ट्रात स्मशान आहे का?; 'काय झाडी, काय डोंगार' म्हणणाऱ्या आमदारावर राऊत भडकले

अपक्ष -

  1. बच्चू कडू
  2. राजकुमार पटेल
  3. राजेंद्र यड्रावकर
  4. चंद्रकांत पाटील
  5. नरेंद्र भोंडेकर
  6. किशोर जोरगेवार
  7. मंजुळा गावित
  8. विनोद अग्रवाल
  9. गीता जैन
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख