अ‍ॅपशहर

'त्या' पोलिसावर मुंबईत उपचार होणार

सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी एका पोलिसावर टि्वट करून 'लठ्ठपणा'वरून मुंबई पोलिसांना टार्गेट केले. त्यामुळे वादळ निर्माण होऊन संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी डे यांच्या या टीकेमुळे त्या 'भारदस्त' पोलिसाचे भलेच होणार आहे. त्या पोलिसावर मुंबई

Lievanta Millar | Maharashtra Times 27 Feb 2017, 12:42 pm
मटा ऑनलाइन वृत्त ।
महाराष्ट्र टाइम्स.कॉम after the joke theres a ray of hope emaans doc will help 180 kg mp cop lose weight
'त्या' पोलिसावर मुंबईत उपचार होणार


सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी एका पोलिसावर टि्वट करून 'लठ्ठपणा'वरून मुंबई पोलिसांना टार्गेट केले. त्यामुळे वादळ निर्माण होऊन संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी डे यांच्या या टीकेमुळे त्या 'भारदस्त' पोलिसाचे भलेच होणार आहे. त्या पोलिसावर मुंबईत उपचार करण्यात येणार आहे.

दौलतराम जोगावत असे या लठ्ठ पोलिसाचे नाव आहे. ते मध्यप्रदेशचे रहिवासी आहेत. त्यांचे वजन १८० किलो आहे. त्यांचे वजन कमी करण्यात येणार आहे. डॉ. मुफज्जल लकडावाला त्यांच्यावर इलाज करणार असून मुंबईच्या सैफी हॉस्पिटलमध्ये जोगावत यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. सध्या लकडावाला हे जगातील सर्वात लठ्ठ महिला इमानवर उपचार करत आहेत.

जोगावत त्यांच्या मुलासह मुंबईला पोहचले असून त्यांच्यावर लवकरच उपचार सुरू होणार आहेत. लकडावाला यांनी डॉक्टरांची एक टीम आमच्याकडे पाठविली होती. त्यांनी जोगावत यांच्यावर उपचार करणार असल्याचं सांगताच त्याला आम्ही लगेच होकार दिला. पोलीस योजनेच्या अंतर्गत जोगावत यांना पाहिजे ती मदत करण्यास आम्ही तयार आहोत, असे मध्यप्रदेशचे पोलीस अधिकारी मनोजकुमार सिंह यांनी सांगितले.

१९९३ मध्ये गॉल ब्लॅडरच्या ऑपरेशननंतर वजन वाढायला लागल्याचे जोगावत यांचे म्हणणे आहे. शोभा डे यांनी टि्वट केल्यानंतर मीडियाने हे टि्वट उचलून धरल्यानेच माझे वजन कमी होण्याची आशा पल्लवीत झाल्याचे सांगत जोगावत यांनी मीडियाचेही आभार मानले. त्यांचा एक फोटो टि्वटवर शेअर करत शोभा डे यांनी 'आज मुंबईत भारी पोलीस बंदोबस्त आहे,' असे टि्वट केले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यास प्रत्युत्तर दिले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज