अ‍ॅपशहर

मराठा आरक्षणानंतर नोकरभरतीला वेग

मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देणारा कायदा एकमताने संमत झाल्यानंतर त्या आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सरकारी नोकऱ्यांतील ७२ हजार पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

Maharashtra Times 5 Dec 2018, 10:45 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maratha-reservation


मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देणारा कायदा एकमताने संमत झाल्यानंतर त्या आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सरकारी नोकऱ्यांतील ७२ हजार पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्याचाच भाग म्हणून राज्य सरकारच्या प्रशासनातील कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची पदे भरण्यासाठीच्या आवश्यक कार्यवाहीसाठी राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या अध्यक्षतेखालील सचिव गटाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पदभरतीच्या प्रक्रियेसाठी गती आली असून मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या सचिव गटामध्ये सामान्य प्रशासन, आरोग्य, ग्रामविकास, माहिती तंत्रज्ञान, महसूल, पाणी पुरवठा, वने या विभागाचे सचिव सदस्य आहेत. मुख्य सचिवांमार्फत दररोज पदभरतीच्या प्रक्रियेबाबत आढावा घेतला जात आहे.

या पदांमध्ये ग्रामीण भागात क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या विविध संवर्गातील पदांचा समावेश असून भरती प्रक्रिया व्यवस्थित आणि लवकर होण्याकरिता नियोजन केले जात आहे. सध्या बिंदू नामावली तपासणीचे काम सुरू असून त्यानंतर या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील, असे मुख्य सचिव जैन यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज